दापोलीचे सर्पमित्र – सुरेश खानविलकर

0
2748

सुरेश खानविलकर हे आपल्या दापोली तालुक्यातील एकमेव अधिकृत सर्पमित्र आहेत. ते गेली १४ ते १५ वर्ष दापोलीत सर्पमित्र म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याबद्दल आणि सर्पांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘तालुका दापोली’ ने त्यांची मुलाखत घेतली. ती मुलाखत खालीलप्रमाणे……

suresh khanwilkar
Dapoli sarpamitra suresh khanwilkar

 

आपल्या दापोलीत सर्पसंख्या कशी आहे ?
दापोलीत सर्पांची संख्या उत्तम आहे. निसर्ग कमी होत चालला, सिमेंटच साम्राज्य वाढतय अस असलं तरी सर्पांची संख्या येथे बरीच आहे.

दापोलीमध्ये कोणकोणत्या प्रकारचे सर्प आढळतात ?
-नाग 
-अजगर  
-घोणस 
-फुरसे 
-दिवड 
-धामण 
-हरटोळ 
-कवड्या 
-मण्यार 
-नानेटी
अश्या १२ – १५ जातीतील सर्प आढळतात.

वरील जातींपैकी विषारी जाती कोणत्या ?
नाग, घोणस, फुरसे, मण्यार ह्या ४ अत्यंत विषारी जाती आहेत. इतर जाती सेमीपॉइझनस आणि बिनविषारी.  
जवळजवळ ८०% तर बिनविषारी असतात.

वरील जातींपैकी दापोलीत प्रामुख्याने आढळणाऱ्या जाती कोणत्या ?
सर्वच. वरीलपैकी सर्वच सर्पजाती दापोलीत आहेत. पूर्वी अजगारांची संख्या कमी होती; पण आता हळूहळू तीही वाढत आहे.

यात साम्यदर्शक सर्पजाती कोणत्या आहेत ?
कवड्या व मण्यार या दोघांमध्ये जवळजवळ ८०% साम्य आहे. दोघांवर पट्टे, रंग जवळपास सारखंच.

मग कवड्या व मण्यार यांना ओळखायचं कसं ?
यांच्या रंगात बारीक भेद आहे. कवड्या ब्राउन कलर तर मण्यार ब्लॅक कलरचा असतो.

जर एखाद्या सर्पाने दंश केल्यास आपण प्रथमोउपचार म्हणून काय केले पाहिजे ?
इतर काही नाही आधी त्वरित डॉक्टर गाठायला हवा. आणि आमच्याशी संपर्क करावा. दंशाची खून पाहून आम्ही लगेच सांगू शकतो, सर्प विषारी होता का बिनविषारी.

लोक सर्पमित्रांची योग्य मदत घेतात का ?
होय, पूर्वीसारखी लोकांची मानसिकता राहिली नाही. म्हणूनच कदाचित, आज दापोलीत सर्पसंख्या बरी आहे.

सर्पमित्रांना शासनाकडून काही मदत मिळते का ?
शासन इतर गोष्टींप्रमाणे याही बाबतीत उदासीन आहे.

सुरेश खानविलकरांनी दिलेल्या माहितीवरून आपल्याला बऱ्यापैकी कल्पना येते की, सर्पांबाबत असलेले मनातले गैरसमजभीती काढून टाकली तर आपल्यालाही त्यांच्याप्रमाणे सर्पमित्र होणे शक्य आहे. दापोलीत सर्पांची संख्या बरीच आहे किंवा ती फार कमी होत नाहीये, ही तर अत्यंत सकारात्मक बाब आहे. या अनुषंगाने तमाम दापोलीकर सर्पमित्रच आहेत असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

 

 

सर्पमित्र सुरेश खानविलकर पकडलेल्या सर्पांची सुरक्षित सुटका करताना

 

सर्पमित्र सुरेश खानविलकर यांच्या बरोबर झालेल्या चर्चेचा पॉडकास्ट

 

दापोलीत कार्यरत असलेले इतर सर्पमित्र

किरण करमरकर
मोबाईल : ९४२२३८२५७८

साई खानविलकर
मोबाईल : ८६००१२५४५४

समीर राऊत
मोबाईल : ९८६०६३१३६९

विलास काणे
मोबाईल : ९२२०१५०१२१

अरविंद देशमुख
मोबाईल : ९४०४१६०००४

अनुप देशमुख
मोबाईल : ८३९००२०६६०

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here