करामती भार्गव लघुकथा (भाग १)

0
82

एकला चलो रे…

दापोली, रत्नागिरीतल छोटंसं पण उंचावर वसलेलं गाव. सगळीकडे हिरवीगार झाडी आणि त्यातून दिसणारी इवलीशी घरं. खूप झाडी असल्याने इथे थंडीही खूप असायची आणि उंचावर असल्याने इंग्रज दापोलीला ‘हिल  स्टेशन’ म्हणायचे. प्रत्येक गावात असतं तसं एक बस स्टॅन्ड दापोलीतही आहे, त्याच्याच शेजारी एक भलं मोठं मैदान आहे त्याला आता  आझाद मैदान म्हणतात. शेजारची गावं ही तितकीच महत्वाची, बस स्टॅन्ड वरून डावीकडे गेलं कि जालगाव आणि उजव्या बाजूला गेलं कि पालगड(साने गुरुंजींचं गाव) आणि पुढे मंडणगड. लाडघर, हर्णे, मुरुड ही सगळी समुद्रही अगदीच जवळ, असं हे निसर्गरम्य दापोली.

दापोली जवळ ‘जालगावात’, फाटक या नावाचं एक ब्राम्हण कुटूंब राहत होतं. फाटक कुटुंब संस्कृतप्रेमी, स्वाभिमानी आणि मुख्य म्हणजे देशप्रेमी होतं. कृष्णाशास्त्री हे फाटक घरातील प्रमुख . त्यांनी मुंबईला संस्कृत पंडित म्हणून खूप नाव कमावलं. त्यांचा मुलगा म्हणजे बाळशास्री हेही तसेच होते. त्यांना केसरी वृत्तपत्र वाचायची फार आवड होती. त्यावेळी केसरी वृत्तपत्र हे विकत घेत येत नसल्याने ते कोणाकडून तरी मागून आणायचे आणि घरात मोठ्याने वाचायचे, त्यामुळे घरात सगळ्यांच्याच कानावर बातम्या पडायच्या. केसरीतल्या बातम्या वाचून वाचून बाळशास्त्रींच्या मनात इंग्रजांबद्दल राग निर्माण झालेला. आपल्या मुलांना आपण इंग्रजी शिकवायचं नाही असं त्यांनी ठाम ठरवलेलं. देशीच वस्तू वापरायच्या आणि परदेशी वस्तूंचा त्याग करायचा असा त्यांचा निश्चय झालेला. बाळशास्त्रींची पत्नी ‘गंगा’ सुद्धा ब्राम्हण घराण्यातली आणि ती हि देशप्रेमी, आपल्या पतीकडून कानावर पडणाऱ्या बातम्या ती नेहमी ऐकत. टिळकांविषयी तिला फार आदर होता. देशाच्या स्वातंत्रयासाठी जमेल तितकी मदत करायची तिचीही तयारी होती.

अशा या देशप्रेमी  बाळशास्री आणि गंगा यांना  मुलगा झाला आणि त्याचं नाव ‘भार्गव’ ठेवलं गेलं. भार्गव हा अतिशय चळवळी मुलगा. त्याला सगळं काही आवडायचं पण अभ्यास म्हटलं कि नकोसं व्हायचं. वडील बाळशास्त्री अभ्यासाला घेऊन बसले कि भार्गव काहीतरी कारण सांगून पळून जायचा. ब्राम्हण घर असल्याने मंत्रांचा जाप कायम चालत असायचा. घर देशप्रेमी आणि टिळक प्रेमी असल्याने सगळेच गुण भार्गव मध्येही आले होते. भार्गव जसा जसा मोठा होत होता, तसा टिळकांबद्दल आणि देशाबद्दल त्याचा आदर आणि प्रेम वाढत होतं. मंत्र, जाप, केसरीच्या बातम्या करत करत भार्गव ९ वर्षांचा झाला. त्याच वर्षी ऑगस्ट मध्ये टिळक गेल्याची बातमी दापोलीत येऊन पोहोचली आणि फाटक कुटुंबाला आपल्याच घरातली एखादी व्यक्ती अचानक निघून जावी तितकाच त्रास टिळकांच्या जाण्याने झाला. टिळक गेल्या नंतर बऱ्याच जणांनी त्यांच्या आठवणीत खूप गोष्टी केल्या, दापोलीच्या लोकांनी टिळकांच्या नावाने राष्ट्रीय शाळा सुरु केली आणि त्याचं नाव ‘टिळक विद्यालय’ ठेवण्यात आलं. भार्गवला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती पण टिळक विद्यालय उघडल्याने आणि टिळकांबद्दलच्या प्रेमाने भार्गव टिळक विद्यालयात जायला लागला आणि तिथे रमला.

राष्ट्रीय शाळा म्हणजे अभ्यासा सोबत हातमाग, सुतारकाम ही कामं सुद्धा करायला मिळायची. भार्गवला अभ्यासापेक्षा ही  सगळी कामं करायला फार आवडायची आणि ही कामे म्हटले कि तो उत्साहाने पुढाकार घ्यायचा. जालगावातला हा भार्गव सर्वसामान्य मुलांसारखा वाटत जरी असला तरी तो तसा नव्हता, त्यात नक्कीच काहीतरी वेगळेपण होतं. देशप्रेम हे आपल्या रक्तात भिनलेललं आहे त्याने त्याच्या लहानपणीच्या पराक्रमांवरून अचूक सिद्ध केलेलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच काहीसं भार्गवच्या बाबतीतही खरं ठरलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here