थोडक्यात तालुका दापोली

दापोली तालुक्यातील सर्व स्तरावरील लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून सध्या, सोप्या पद्धतीने अंकात्मक (डिजिटल) स्वरूपात माहिती उपलब्ध करून देणे. जेणे करून दापोलीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल व दापोली तालुका अधिकाधिक सक्षम आणि संपन्न होईल.

( या माहितीआधारे दापोली तालुक्यातील शेतकरी वर्ग, छोटे व्यवसायिक, शासकीय संस्था, शिक्षण संस्था, उद्योजक, नोकरदार, इ. साठी मदतनीस होण्याचा आमचा प्रयत्न राहील )

मूळ कारण किंवा हि संकल्पना  का आली

झंझावाती वेगानं वाढणारी आधुनिकता गाव आणि गावाचे गावपण नष्ट करत चालली आहे.  विकास होतोय असं मानलं, तरी  ह्या विकासात मूळ भूमिपुत्र सबळ होताना दिसत नाही. उलट अधिकाधिक भरडला जातो, हे चित्र आहे. त्यामुळे बदलत्या विकासाशी मूळ मातीतला माणूस जोडलेला असावा आणि त्याच बरोबरीने त्याच्याशी जोडलेला पारंपरिक, सांस्कृतिक, जगण्याचा समृद्ध ठेवा शतकानुशतके टिकून राहावा,

या विचाराखाली उचलेला हा मुंगीएवढा वाटा.

आम्ही कोण आहोत

आम्ही  या माहती क केंद्रामार्फत दापोली गाव आणि शहर यातील सर्व लोकांना एकत्रित करू पाहतोय. शिवाय जे मूळ दापोलीचे असून सध्या मुंबई आणि अन्य भागात वसलेले आहेत, अशा सगळ्यांना माहितीच्या जाळ्यात आणून हे जाल दापोलीत आणून रुंद करायचे आहे. ज्यामुळे लोक माहिती देऊन-मिळवून स्वतः व दुसऱ्याला अधिकधीक कार्यक्षम करून भरभराटीस येतील. त्यामुळे इथे आम्ही केवळ एक माध्यम आहोत.

कोणत्या प्रकारची माहिती उपलब्द्ध असेल?