स्वातंत्र्य चळवळीच्या काळात मुंबई आणि देशाच्या इतर महत्वाच्या प्रांतांबरोबर दापोलीचाही महत्वाचा सहभाग होता.

भारताची जनता हि ब्रिटिशांविरुद्ध नाही आहे, हे जगाला दाखवून देण्यासाठी राज्याच्या गव्हर्नर्सनी आपापल्या प्रांताचे दौरे काढले होते.

मुंबईच्या गव्हर्नरनेही (सर फ्रेडरिक साईक्स) कोकणातील दापोली, रत्नागिरी व मालवण अशा ३ ठिकाणी भेटी दिल्या.

अशी देशाच्या राजकारणात व समाजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या दापोलीत काही शूर हुतात्मे होऊन गेले. तालुकादापोली चा हा प्रोजेक्ट ब्रिटिश राजवटीविरुद्ध च्या संग्रामात उडी मारणाऱ्या दापोली व दापोली जिल्यातल्या थोर माहात्म्याबद्दल असेल.

सध्यस्थितीत संशोधनासाठी खालील विभाग नियोजीत आहेत.

१. पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)
(अ . “श्यामची आई” पुस्तक, लेखक – साने गुरुजी,   ब. ठिकाणे – पालगड, दापोली)

२. भार्गव महादेव फाटक (बाबा फाटक)
(अ . “एकला चालो रे” पुस्तक, लेखक – द्वारकानाथ लेले,   ब. ठिकाणे – जालगाव, हर्णे, दापोली)

३. शिवराम भिकू मुरकर

४. पुरुषोत्तम गणेश मराठे

५. चंद्रकांत खेमाजी मेहता

६. सुडकोजीं बाबुराव खेडेकर

इतर सर्व प्रोजेक्टस प्रमाणे, “दापोलीचे स्वातंत्र्य सेनानी” हा प्रोजेक्ट देखील संशोधनासाठी सतत कार्यरत असेल.

संशोधनातून गोळा केलेली माहिती डिजिटल आणि सोशल माध्यमाने लेख, लघुकथा, चित्रकथा आणि माहितीपटांतून प्रकाशित  केली जाईल.

 

सहभाग घेण्यासाठी

तुम्ही संशोधनातल्या कुठल्या विषयावर सहभाग घेऊ इच्छिता ते खालील पत्यावर कळवा.
ई-मेल : [email protected]
व्हाट्सअँप ग्रुप : 7045350707

बाबा फाटक

दापोलीतील स्वातंत्र्य सैनिक बाबा फाटक यांच्या घराला तालुका दापोलीच्या दिलेली भेट आणि त्याची माहिती – फोटो संग्रह