कोकणात पावसाळ्यात खूप आवडीने खाल्ली जाणारी अळंबी ही लोकप्रिय रानभाजी आहे. पावसाळ्यात साधारण श्रावण महिन्यातील पुष्प नक्षत्रात टपोऱ्या थेंबांच्या पावसात ही अळंबी उगवतात. जंगल परिसरात अशी अळंबी आपोआप उगवतात. अनेक ठिकाणच्या जंगल परिसरात अशी पांढरीशुभ्र अळंबी उगवतात. मात्र अळंबी शोधताना ती काळजीपूर्वक तपासून शोधावी लागतात. कारण किंचित पिवळसर, पिवळीधमक, किंचित काळसर, ओंडक्यांवर उगवणारी अळंबी विषारी असतात. विषारी अळंबी खाणे आरोग्यास धोकादायक आहे. मोकळ्या रानात अंतरा अंतरावर उगवलेली अशी अळंबी गोळा करण्यासाठी जंगलाचा परिसर पायी तुडवावा लागतो. काही ठिकाणी वारुळावरही अशी खूप अळंबी येतात. वारुळावर उगवलेली अळंबी वारुळातील नाग खातो असा गैरसमज आहे. मात्र नाग अशी अळंबी कधीही खात नाही. एकदा उगवण्यास सुरुवात झालेली अळंबी आठवडाभर उगवत राहतात. सकाळी लवकर व संध्याकाळी ही अळंबी उगवतात. अळंबी शोधण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी रानात जावे लागते. उगवलेली अळंबी दिवसभर तशीच राहिली तर पाऊस पडल्याने खराब होतात. याशिवाय बारीक काळे भुंगे अशी अळंबी पोखरतात. अळंबी मातीतून उगवत असल्याने त्यांना माती लागलेली असते. सकाळी लवकर टोपीसारखी दिसणारी अळंबी नंतर पूर्ण उमलल्यावर छत्रीसारखी दिसतात. घरी आणलेली अळंबी पाण्यात धुवून स्वच्छ पुसून घेतल्यावर कापून त्याच्या फोडी करतात. कांदापातीची भाजी करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने अळंबीभाजी करतात. अळंबी भाजीत खाज नसली तरी शिजवताना कोकम टाकण्याची पद्धत आहे. सुकी कोलीम टाकूनही अळंबीची छान रुचकर भाजी होते. लोखंडी तव्यावर शिजवलेली अळंबीची भाजी अधिक रुचकर लागते.