ग्रामलक्ष्मी शेतकरी गट, देवके आणि क्रॉपव्हेट ऍग्रो यांनी दि.२७ फेब्रु. २०२१ रोजी आयोजित केलेला समृद्ध शेतकरी -निरोगी ग्राहक या संकल्पनेतून सेंद्रिय शेती व सामूहिक शेती हा कार्यक्रम मु. देवके येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात तालुक्यातील जेष्ठ साहित्यिका व समाजसेविका सौ. रेणू दांडेकर उपस्थित होत्या. यांनी “कोकणाचा कॅलिफोर्निया करू नका तर आत्ता आपल्या कोकणाचे उदाहरण त्यांना द्या. समृद्ध कोकण, आत्मनिर्भर कोकण यातल्या सर्व गोष्टी या शेती मध्ये आहेत” असे सांगितले. यावेळी क्रॉपव्हेटचे विलास पारावे यांनी ग्रामलक्ष्मी प्रकल्प कसा गरजेचा आहे हे सांगितले आणि त्याची उद्दिष्टे आपल्या भाषणाद्वारे उपस्थितांसमोर मांडली. ‘संतोष अबगुल प्रतिष्ठानचे’- संतोष अबगुल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कोणत्याही शेतकरी बांधवाना शेतीविषयी काही अडचण आल्यास अगदी कृषि मंत्रालयापर्यंत धाव घेण्यास प्रतिष्ठान सक्षम आहे याची त्यांनी उपस्थितांना ग्वाही दिली. सरपंच श्री. दिपक अडविलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. रत्नागिरी जिल्हा नाबार्डच्या श्रीमती श्रद्धा हजारणीस यांनी नाबार्डने आत्ता पर्यंत शेतीसाठी जास्तीत जास्त अर्थ सहाय्य कृषि विषयी यंत्रणे मार्फत शेतकऱ्यापर्यंत कसे पोहचविले हे सांगितले व यानंतरही शेती आणि शेती पूरक व्यवसायासाठी संबंधित विभागा मार्फत शेतकऱ्यांना सहाय्य करण्यास नाबार्ड बांधील आहे अशी हमी दिली. तसेच महिला एकत्र येऊन सामूहिक शेती करीत आहेत याबद्दल त्यांनी ग्रामलक्ष्मी गटांचे अभिनंदन केले. श्री. नंदकुमार रघुवीर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रतिनिधिक स्वरूपात एका ग्रामलक्ष्मी गटाच्या प्रकल्पाचे उदघाटन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पाअंतर्गत शेतीपूरक व्यावसायिक गटाची स्थापना करण्यात आली आणि या गटात सौ. पल्लवी बैकर, सौ. मानसी बैकर, सौ. प्रणिता जाधव, सौ. प्राची तांबीटकर,सौ. विनया गोरीवले, सौ. सोनल खामकर ,सौ. सपना गोरीवले, सौ. राजश्री गोवले, सौ. सुलोचना तळवटकर कु. सपना गोलंबडे, सौ आकांक्षा गोरीवले आणि सौ. पूर्वा गोरीवले या गृहलक्ष्मीचा सहभाग आहे. सदर कार्यक्रमास सौ. प्रज्ञा विलास पारावे, सौ. निधी निलेश तांबे. श्री अमित पाटील, प्रकल्प अधिकारी (दापोली विभाग), श्री. संतोष घाडगे, श्री. सुधीर चिविलकर, श्री. विवेक खापरे आणि देवके गावाचे समस्त ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता दुपारच्या वन भोजनाने करण्यात आली.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |