दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) ; रत्नागिरी यांच्या मार्फत ‘ विकेल ते पिकेल’ हे अभियान गव्हे – लोहारवाडी येथे सुरु झाले. लोहारवाडी येथील २ एकर प्रक्षेत्रावर श्री.सुधाकर मोरे, श्री.मंगेश चव्हाण, श्री.अजय जाधव, श्री.विजय कोळंबेकर, श्री.संजय लिंगावले या शेतकऱ्यांनी सामुहिक शेतीद्वारे कलिंगड या पिकाचे उत्पादन यशस्वी रित्या केले आहे. सदर शेतमाल तसेच अन्य स्वतः उत्पादित केलेल्या मालाचे विक्री केंद्र स्वतः सुरु केले आहे.
श्री.दीपक कुटे – उपविभागीय कृषि अधिकारी यांच्या हस्ते फित कापून अभियानाला सुरुवात झाली. त्यांनी सामुहिक शेती व शेतमाल विक्रीसाठी ‘विकेल ते पिकेल’ यासारख्या अभियानाची कशी गरज आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास श्री.प्रदीप थेटे – तालुका कृषि अधिकारी, श्री.जयकुमार मेटे – मंडळ कृषि अधिकारी, श्री राजेश भावठाणकर, कृषी पर्यवेक्षक, गणेश कोरके – तालुका तंत्र व्यवस्थापक, श्री.मोहन दुबळे – कृषि सहाय्यक यांची उपस्थिती होती.
सामुहिक शेतीचे प्रात्यक्षिकासाठी गव्हे गावच्या कृषि सहाय्यक – सौ.दर्शना वरवडेकर व श्री.उदय शिगवण यांनी वेळोवेळी प्रक्षेत्रावर जाऊन सामुहिक शेती कशी करावी? कलिंगड हे पिक घेताना कोणते पिकसंरक्षक सापळे लावावेत? कोणत्या उपाययोजना वानर व इतर प्राण्यांपासून रक्षणासाठी कराव्या? याचे मार्गदर्शन केले. गावप्रमुख श्री.विजय भागोजी कोळंबेकर यांनी सर्व अधिकाऱ्यांचे या कार्यक्रमात आभार मानले.