लोककला हि कुठल्याही समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा एक महत्वाचा पैलू असते. लोककलेंमध्ये त्या त्या भौगोलिक प्रांतातील विविध सामाजिक घटकांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे प्रतिबिंब सापडू शकेल. मानवी समाजाच्या विविध कलात्मक रूपांनी रचलेली लोककला, संस्कृतीची हि प्रतिबिंब शतकानुशतके पुढे सरकवत येत असते.
महाराष्ट्रातल्या अश्या अनेक लोककलांवर उपलब्ध असलेलं लिखाण व चित्रण प्रगल्भ आहे. आणि त्यात वर्षानुवर्षे वाढ देखील झालेली दिसते.
आजही दापोली तालुक्यात, कोकण प्रांतातील अनेक प्राचीन लोककलेचें प्रकार पाहायला मिळतात. परंतु अनेकदा लोककलेच्या ह्या प्रकारांबद्दल फारच कमी किंवा सांस्कृतिक दृष्ट्या विशेष अशी काहीच माहिती मिळत नाही.
तालुकादापोलीचा हा प्रोजेक्ट अश्या अजूनही तग धरुन बसलेल्या लोककलेंवर आधारीत आहे. दापोली तालुक्यातील लोककलेच्या विविध प्रकारांचा अभ्यास करुन त्यातल्या समाज-संकृतीचा डिजिटल दस्तावेज उपलब्ध करणे हा आमचा प्रमुख प्रयत्न असेल.
सध्यस्थितीत संशोधनासाठी खालील विषय नियोजीत आहेत.
- काटखेळ
- नमन
- बाला नृत्य
- गोंधळ
- भजन
- कीर्तन
- फ़ुगडी
- दशावतार
- गवळण
- शक्ती तुरा
वरील दिलेल्या विषयांशिवाय, नवीन विषयाबद्दल देखील संशोधन व दस्तावेज करण्याचे काम योजले जाऊ शकेल.
इतर सर्व प्रोजेक्टस प्रमाणे, लोककलेचा प्रोजेक्ट देखील संशोधनासाठी सतत कार्यरत असेल.
संशोधनातून गोळा केलेली माहिती डिजिटल आणि सोशल माध्यमाने लेख, लघुकथा, चित्रकथा आणि माहितीपटांतून
प्रकाशित केली जाईल.
सहभाग घेण्यासाठी
तुम्ही संशोधनातल्या कुठल्या विषयावर सहभाग घेऊ इच्छिता ते खालील पत्यावर कळवा.
ई-मेल : [email protected]
व्हाट्सअँप ग्रुप : दापोलीच्या लोककला : 7045350707