दापोली तालुक्यातील ‘ज्येष्ठ साहित्य मित्र’ अशी ओळख असणारे ‘श्री. सावळाराम विष्णू परांजपे’ उर्फ अण्णा परांजपे. अण्णांचे जन्मगाव दापोलीतील ‘पालगड’. अण्णांचे नशीब थोर म्हणून त्यांना बालपणी पूज्य साने गुरुजींचा अतिशय जवळचा सहवास लाभला.
अण्णा आजही त्या जुन्या आठवणींनी गदगद होतात. साने गुरुजींच्या आचार-विचारांचा प्रभाव त्यांच्यावर भरपूरसा पडला. याशिवाय अध्यात्म, वाचन, भारतीय परंपरा, अस्मिता, इतिहास व कुलाचार इत्यादी मूल्यांचा त्यांच्या जीवनात अंतर्भाव असल्यामुळे त्यांनी शिक्षकी पेशा स्विकारुन गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त साहित्य, अध्यापन आणि भाषिक सेवा केली. दापोलीतील १५ पेक्षा जास्त वाचनालयांच्या उभारणीत अण्णांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच जालगाव मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या रम्य जीवन कट्टा या उपक्रमाच्या निर्मितीमागे अण्णा अग्र स्थानी होते. त्यांच्या साहित्यिक व सार्वजनिक कामांमुळे अण्णांना अनेक प्रकारच्या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
त्यामध्ये सण २०१४ सालचा कोकण मराठी साहित्य परिषदेकडून ‘साहित्य मित्र पुरस्कार’, जनजागृती प्रतिष्ठान कडून २०१३ साली गौरव चिन्ह, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (चिपळून) यांच्याकडून सन्मानचिन्ह, पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालगड यांच्या कडून सन्मानचिन्ह, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय, संघ रत्नागिरी यांच्याकडून “आदर्श ग्रंथालय” कार्यकर्ता पुरस्कार; स्नेहदीप दापोली. इंदिराबाई वामन बडे करणं बधिर विद्यालय यांच्याकडून सन्मानचिन्ह, श्री. गजानन महाराज भक्त मंडळ गिम्हवणे यांच्या कडून परोपकारी मित्र पुरस्कार व सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे.
We’re glad to state that we met Anna in our childhood daya. We feel like he is source of positivity.