डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

0
5093

योजनेचा उद्देश :
अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देणे.

योजनेचा तपशील :
अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकऱ्यांसाठी डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर  कृषी  स्वावलंबन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेअंतर्गत खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल.

अ.क्र. बाब अनुदानाची मर्यादा (रुपये)
नवीन विहीर २,५०,०००/-
जुनी विहीर दुरुस्ती ५०,०००/-
इनवेल बोअरींग २०,०००/-
पंप संच २५,०००/-
वीज जोडणी आकार १०,०००/-
शेततळयांचे प्लास्टिक अस्तरीकरण १००,०००/-
सूक्ष्म सिंचन संच परीच्छेद ७ मध्ये नमूद मंत्री मंडळ उपसमतीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार

या योजनेंतर्गत खालील १ ते ६ पैकी एकाच पॅकेजचा लाभ अनुज्ञेय राहील.

  1. नवीन विहीर पॅकेज
    अ) नवीन विहीर, पंपसंच, वीजजोडणी आकार, ठिबक सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग किंवा
    ब) नवीन विहीर, पंपसंच, वीजजोडणी आकार, तुषार सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग
  2. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    अ) जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीजजोडणी आकार, ठिबक सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग किंवा
    ब) जुनी विहीर दुरुस्ती, पंपसंच, वीजजोडणी आकार, तुषार सिंचन संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग
  3. शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज : ज्या शेतकऱ्यासग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमध्ये शेततळे मंजूर झाले असेल अशा शेतकऱ्यांनाच या पॅकेजचा लाभ घेता येईल.
    अ) शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार व ठिबक सिंचन संच किंवा
    ब) शेततळयाचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, पंपसंच, वीजजोडणी आकार व तुषार सिंचन संच
  4. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बंाधली असेल अशा शेतकऱ्यांच्या विहीरीसाठी
    अ) पंपसंच, वीजजोडणी आकार व ठिबक सिंचन संच किंवा
    ब) पंपसंच, वीजजोडणी आकार व तुषार सिंचन संच
  5. सोलरपंपासाठी अनुदान : ज्या शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडुन सोलरपंप मंजूर झाला असेल तर पंपसंच व वीजजोडणीसाठी अनुज्ञेय
    अनुदानाच्या मर्यादेत (रु. 35000/-) लाभार्थी हिस्स्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल.
  6. वरील घटकांपैकी लाभार्थ्याकडे काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक घटकांची निवड करावी.
    (1) पंपसंच, (2) वीजजोडणी आकार (3) ठिबक सिंचन संच किंवा (4) तुषार सिंचन संच

 

लाभार्थी पात्रतेच्या अटी

डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर  कृ षी  स्वावलंबन  योजनेअंतर्गत योजनेचा  लाभ  घेण्यासाठी

खालील अटींची पूर्तता करणे लाभार्थी पात्र असतील:

  1. लाभार्थी हा अनुसूचित जाती/नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे
  2. शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
  3. शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा ७/१२ दाखल व ८-अ उत्तर असणे आवश्यक आहे.
  4. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  6. दारीद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य.
  7. दारीद्रय  रेषेखाली  नसलेले  अनुसूचित जाती/नवबौद्ध  शेतकरी  खालील  अटींची  पूर्तता करत असतील तर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
    अ. शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा जास्त नसेल.
    आ. सदर  शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर  व  कमाल  ६ हेक्टर  एवढी  शेत  जमीन असेल.

 

योजनेची अंमलबजावणी :
क्षेत्रियस्तरावर सदर योजना जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडुन राबविण्यात येत आहे.

 

Other references:
Link to PDF file (Government directive)
https://www.youtube.com/watch?v=2PnRGRDnnfE
https://www.youtube.com/watch?v=e1zKhUxwBsI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here