स्थळ: शेतकरी निवास, प्रशिक्षण हॉल, डॉ. बाबासाहेब कृषी विद्यापीठ, दापोली
दिनांक: ६/१२/२०१८, गुरुवार दुपारी ३.०० – ४.३० वा.
उपस्थित शास्त्रज्ञ: डॉ. सी. डी. पवार, सहयोगी प्राध्यापक, (उद्यानविद्या), फळप्रक्रिया युनिट, वायनरी युनिट, डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठ, डॉ. सोमनाथ सोनवणे, प्रमुख कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान, डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठ, दापोली.
समन्वयक:
डॉ. संतोष वरवडेकर, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. बाळासाहेब कृषी विद्यापीठ, दापोली. श्री. सचिन हाके, तालुका कृषि अध्यक्ष, कृषि विभाग, श्री. गोसावी, कृषि पर्यवेक्षक, श्री. विनायक महाजन, श्री. दळवी, श्री. भावेश धामणे, श्री. भागवत, श्री. चव्हाण, श्री. जगदाळे आणि इतर शेतकरी तसेच, स्लेव्हज कंपनीचे श्री. संतोष कानसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
चर्चिले गेलेले विषय:
डॉ. सी. डी. पवार, फळप्रक्रीयेमध्ये २० प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ, सहा प्रकारची सरबतं यांची माहिती दिली.
डॉ. सोमनाथ सोनवणे यांनी नागली बिस्कीट, खारी, कुरकुरे यांच्या मशिनरींची माहिती दिली, मनुष्यबळाची कमतरता त्यांनी विशद केली.
विनायक महाजन प्रक्रियेकरिता मूलभूत प्रशिक्षण, स्वच्छता व इतर स्टॅंडर्डस यांचे प्रशिक्षण आयोजित करण्याची विनंती केली. तसेच hands on प्रशिक्षणाची मागणी केली. आंब्याचा रस, काजूंचा रस साठविण्यासाठी cold storage साठी प्रस्ताव करण्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले. यासाठी विस्तार शिक्षण संचालनाच्या वतीने कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले.
डॉ. वरवडेकर यांनी दहावी/ बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या वेळी प्रशिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी शाळा (हायस्कुल), कॉलेज मध्ये पत्र देण्याचे निश्चित करण्यात आले.
पुढील सभेचा विषय:
काजू आणि आंबा बागेमध्ये आंतरपिक ५ जानेवारी २०१९
स्थळ: कुडावळे दुपारी ३.०० वाजता