उन्हवरे गरम पाण्याचे झरे | तालुका दापोली

0
6616

कोकण प्रदेशातील ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत. ह्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ  भाविक, पर्यटक  आणि हल्लागुल्ला करणारे  पर्यटक कायमच गर्दी करतात. दापोली  तालुक्यात असे गरम पाण्याचे कुंड  उन्हवरे या गावी आहेत. उन्हवरे हे गाव दापोली शहरापासून 35 कि.मी अंतरावर आहे.

या कुंडात वर्षाचे बाराही महिने गरम पाणी असते, कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीही आटत नाहीत. उन्हाळा  असो वा पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते. आणि  पाण्याच्या तापमानातही अजिबात फरक पडत नाही. येथील झऱ्यांचा वेग ताशी आठ ते दहा हजार लिटर आहे. आणि पाण्याचे तापमान 70 अंश सेल्सिअस.

या पाण्यात गंधक आणि कार्बन डाय ऑक्साईडचे मिश्रण आहे. गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्यात अंघोळ केल्यानंतर त्वचा रोग नाहीसे होतात शिवाय दिवसभराचा थकवा असला तरी तो क्षणभरात चटकन नाहीसा होतो. फक्त या पाण्यात उपाशीपोटी जाणे टाळावे, कारण उपाशीपोटी असल्यास चक्कर येण्याची शक्यता वाढते. उन्हवरे येथे कमरे एवढे पाणी राहील अशा स्नान कुंडाची व्यवस्था केलेली आहे. शिवाय स्त्रियांसाठी बंदिस्त  स्नान कुंडही आहेत. या स्नान कुंडात आंघोळ करणे निश्चितच एक आल्हाददायक आणि सुखद अनुभव असतो. गावातील लोक तर हा अनुभव रोजच्या रोज अगदी आवर्जून घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here