दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी पेन्शनर्स हॉल, दापोली या ठिकाणी दापोलीतील शेतकरी, समाजसेवक, उन्नत भारत अभियानाचे ग्रामसमन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य कृषि विभागाच्या ‘आत्मा’ या संस्थेचे अध्यक्ष, दापोली तालुक्यात बिगर राजकीय शेतकरी संघटनेसाठी कार्यरत असलेले श्री. विनायक श्रीकृष्ण महाजन (काका महाजन) यांनी लिहिलेल्या ‘शेतीतून समृद्धीकडे’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम पार पडला. डॉ. संतोष वरवडेकर – नोडेल ऑफिसर (उन्नत भारत अभियान ); व्यवस्थापक,कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित शेतकरी बांधवांसमोर करण्यात आले.
‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या, समस्या आणि त्यावरील समाधान’या गोष्टी व्यवस्थित अभ्यास करून मांडताना श्री.विनायक श्रीकृष्ण महाजन यांनी त्यांचा शेतीशी संबंधित १९९३ पासूनचा अनुभव सांगितला आहे. शेतीचा अभ्यास करताना कालानुरूप बदलत गेलेलं शेतीचं स्वरूप, शेतीबाबतीतले आर्थिक नियोजन कसं होतंय? शेती टिकून राहण्यासाठी आधुनिक युगात व्यवस्थापन कसे करावे? शेतीशी निगडीत अनेक तांत्रिक गोष्टी या पुस्तकात सविस्तर मांडलेल्या आहेत.
लवकरच हे पुस्तक www.bookganga.com या संकेतस्थळावर वर उपलब्ध होणार आहे. अतिशय कमी दरात हे पुस्तक असून पुस्तकाचे सर्व हक्क लेखक श्री.विनायक श्रीकृष्ण महाजन यांच्या स्वाधीन आहेत.
शेतकरी बांधवांसाठी, शेतीबाबतीत जाणून घेणाऱ्या प्रत्येक व्यक्ती करिता हे पुस्तक फायद्याचे आहे. या पुस्तकाच्या प्राप्तीसाठी अथवा अधिक माहिती साठी श्री.विनायक श्रीकृष्ण महाजन यांच्याकडे संपर्क साधावा.
विनायक महाजनांबद्दल अधिक माहिती-