रवी तरंग कार्यक्रम – दापोली

0
2044

२९ डिसेंबर २०१९, रविवार रोजी कर्णबधिर विद्यालय, शिवाजीनगर, दापोली येथे ‘नि रे ग प्रस्तुत रवी तरंग’ हा  दापोलीतील संगीतकार ‘डॉ. रवींद्र बागूल’ यांनी संगीतबद्ध केलेल्या निवडक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रवेश मूल्य ऐच्छिक होते आणि ‘स्नेहसंध्या प्रतिष्ठान संचालित, कै. गणेश दत्तात्रय दातार वृद्धाश्रम, मौजे दापोली’ यांच्या मदतीकरता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात गायक म्हणून स्थानिक कलावंत प्रल्हाद मालशे, अभिषेक जोशी, डॉ.प्रकाश घांगुर्डे, राजेश मिरवणकर, पूजा लागू, तन्वी गुरव हे कलाकार उपस्थित होते. वाद्यवृंद साथ अजय दामले (तबला), दिलीप मोहिते (हार्मोनिअम), विनय मुसळे, सिंथेसाइझर, अशोक मांडवकर (पखवाज), प्रदीप बर्वे यांनी दिली. वैदही दामले, निवेदिता दामले, संगीता दळवी यांनी निवडक रचनांवर नृत्यसादर (भारतनाट्यम )केले. या कार्यक्रमातून  ‘स्नेहसंध्या प्रतिष्ठान संचालित, कै. गणेश दत्तात्रय दातार वृद्धाश्रम, मौजे दापोली’ करता आर्थिक सहाय्याचे लोकांना आवाहन करण्यात आले.

मदत इच्छूक मंडळी  ‘स्नेहसंध्या प्रतिष्ठान संचालित, कै. गणेश दत्तात्रय दातार वृद्धाश्रम, मौजे दापोली’

A/C NO. 1330104000003995 IFSC. IBKL0001330/MICR415259176

येथे पैसे जमा करू शकतात.  वृद्धाश्रमाकडून आपल्याला पावती पोच केली जाईल.

संगीतकार ‘डॉ. रवींद्र बागूल’ यांचा अल्पपरिचय

  • श्री. कृष्णराव दसकर यांच्याकडे २० वर्षांचे संगीत शिक्षण.
  • कै. ना. म. केळकर, दापोली यांच्याकडे ४ वर्षे संगीत शिक्षण.
  • आत्तापर्यंत ४ सी.डी चें प्रकाशन आणि संत कबीरांच्या रचना(पुणे), मुखी नाम माझ्या(ठाणे), सावरकर गीते(दापोली, रत्नागिरी) (कै.मंगेश पाडगावकर, कै. श्रीनिवास खळे श्रद्धांजली )अशा अनेक कार्यक्रमातून सक्रिय सहभाग.
  • मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक विभाग आंतरमहाविद्यालयीन संगीत स्पर्धा समन्वयक.
  • ४० वर्षे वनस्पतीशास्त्र प्राध्यापक.

 

‘रवी तरंग’ या कार्यक्रमात सादर केलेली गाणी.

मुखी नाम माझ्या विठोबा विठोबा……

कवीला विठ्ठल दर्शनाची ओढ लागली आहे व ही भेट कशी होईल, त्यासाठी काय करू? या विचारात असताना कवीच म्हणतो, “अरे, तुला पाहायचे आहे ना त्याला? मग ते काय, तो समोरच उभा आहे.”  कवी खावर यांची सुंदर रचना ऐकू डॉ. प्रकाश घांगुर्डे यांच्या आवाजात.


परिचय – डॉ. प्रकाश घांगुर्डे

व्यवसायाने होमिओपॅथी  असलेले डॉ. प्रकाश घांगुर्डे दापोली होमिओपॅथी मेडिकल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
संगीतामध्ये विशारद असून अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे परीक्षक आहेत.
पुणे आकाशवाणीवर सुगम संगीत कलाकार आहेत.

हरी पायी लीन झाले माझे मन…….

पंचज्ञानेंद्रिय, मन व बुद्धी यांच्या पलीकडे जाऊन घेतलेला अनुभव म्हणजे अनुभूती. संतांना झालेले ईश दर्शन हा अनुभतीचाच भाग आहे. संत स्वरूपानंदांनी त्यांना आलेली एकतत्वाची प्रचिती या वरील रचनेतून शब्दबद्ध केली आहे.

परिचय – श्री. प्रल्हाद मालशे

संगीत शिक्षण आंबर्डेकर गुरुजी, केळकर गुरुजी व पटवर्धन बुवा यांच्याकडे झाले.
लहानपणापासून संगीत व भजनाची आवड.
गीत गायनाच्या विविध कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग असतो.

का सोवो सुमिरन के बेरिया

हे जग पहाटेच्या दवबिंदू प्रमाणे आहे. यातून सुटका हवी असेल तर माणसा, प्रभूच्या नावाचा जप कर. नामस्मरणाचा मार्ग दाखविणारे संत कबीरांचे ‘का सोवो’ हे काव्य. सादरकर्ता आहेत अभिषेक जोशी.

परिचय – अभिषेक जोशी

  • १९ वर्ष संगीतात रममाण.
  • विशारद पर्यंतचे शिक्षण श्री. केळकर गुरुजींकडे.
  • कै.श्री. नारायण बोडस यांच्याकडून ग्वाल्हेर – आग्रा घराण्याच्या गायकीची तालीम.
  • श्री. केदार बोडस यांच्याकडून भेंडी बाजार घराण्याची तालीम.
  • २००० साली मध्ये सुवर्ण पदक प्राप्त.
  • आकाशवाणीच्या ‘युवा वाणी’ कार्यक्रमामध्ये सहभागी.
  • संगीत सौभद्र या नाटकामध्ये कृष्णाची भूमिका व या भूमिकेसाठी राज्य स्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट गायक नटाचे पारितोषिक.
  • ‘भेटी लागी जीवा’ नाटकात भूमिका व या नाटकाला झी मराठीचे नामांकन.
  • अनेक ठिकाणी शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम.

ते दान त्या क्षणाचे, घेता मला न आले.

कधी कधी परिस्थिती इतकी विचित्र असते की, संधी असून देखील माणसाला ती कमावता येत नाही. सर्वस्वपणाला लावावे लागते. आणि हीच संधी मानसिक दुर्बलतेमुळे आपल्याकडून निसटून जाते, तेव्हा त्याची बोच अधिक सलत राहते. मंगेश पाडगावकरांचे हे भावगीत सादर केले आहे राजेश मिरवणकर यांनी.

परिचय – राजेश मिरवणकर

  • संगीत विशारद.
  • संगीत शिक्षण केळकर गुरुजींकडे.
  • दापोली व बाहेर अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये सहभाग.
  • डॉ. बागूल यांच्या ‘भक्तिरंग’ या संगीत सी.डी मध्ये गीत गायन.
  • गोखले सरांच्या ‘संस्कार गीते’ या संगीत सी.डी मध्ये गीत गायन.
  • उत्तम तबला वादक. तबल्याचे शिक्षण श्री. आठवले गुरुजींकडे
  • एका छोटेखानी मैफलमध्ये ‘यशवंत देव’ यांना तबल्यावर साथ.

धरुनी माझा हात हाती

कवी खावर या रचनेमध्ये कृष्णभक्त होऊन शोध घेत आहेत की, कोण मला मार्गदर्शन करीत आहे? कोण मला सावरत आहे? मालगुंजी रागात स्वरबद्ध केलेली ही रचना ऐकू पूजा लागू यांच्या आवाजात.

परिचय – पूजा लागू

  • संगीत शिक्षण केळकर गुरुजींकडे.
  • ‘संगीत शारदा’ नाटकामध्ये ‘वल्लरी’ ची भूमिका साकारली.
  • ‘संगीत सौभद्र’ नाटकामध्ये ‘रुक्मिणीची’ ची भूमिका साकारली.
  • ‘संगीत शारदा’ नाटकाला राज्य नाट्य स्पर्धेचे तिसरे पारितोषिक.
  • संस्कार भरतीच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग.

गुरु से लगन कठीण है भाई

सात द्विप नौ खंड में, गुरु से बडा न काई ।

करता तो कुछ कर ना सके, गुरु करे सो होई ।।

अशा शब्दात कबीरांनी गुरु महती सांगितली आहे. गुरुकृपा होणे कठीण असले तरी महत्त्वाचे आहे सांगणारी ही रचना सादर केली आहे ‘तन्वी गुरव’ हिने.

परिचय – तन्वी गुरव

  • इयत्ता ११ वीत असतानाच संगीत विशारद.
  • संगीत शिक्षण ‘श्रुती आंबर्डेकर’ यांच्यापाशी सुरु.
  • संस्कार भारती तर्फे आयोजित गायनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग.

नृत्य – जय गणेश गणनाथ दयानिधी

राजस्थान मधील सिद्धपुरुष ब्रह्मानंद यांनी रचलेली ‘जय गणेश गणनाथ दयानिधी’  या रचनेवर नृत्य सादर केले आहे ‘वैदेही दामले’ हिने.

परिचय – वैदेही दामले

  • गुरु एस. वसंथा यांच्या कलांजली या संस्थेत भरतनाट्यमचे धडे घेत आहे. विशारद प्रथम ही परीक्षा दिली आहे.
  • काला घोडा या नामांकित आर्ट फेस्टिव्हल मध्ये नृत्य सादर केले आहे.
  • गाण्याच्याही परीक्षा दिल्या आहेत.
  • सध्या ११ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.

जय दुर्गे दुर्गती परिहारीनी 

दुर्गा स्तवन – जय दुर्गे दुर्गती परिहारीनी  ही ब्रह्मानंदांची प्रसिद्ध रचना आहे. भटियार रागात संगीतबद्ध केलेल्या या रचनेवर नृत्य सादर केले आहे,  निवेदिता दामले व  संगीता दळवी’ यांनी.

परिचय – निवेदिता दामले

  • गुरु एम. वसंथा व गुरु राजी नारायण यांचेकडे भरतनाट्यमचे शिक्षण.
  • श्रीमती प्रसाद यांचेकडे कुचिपुडी नृत्याचे शिक्षण.
  • डॉ. तुषार गुहा यांच्या संस्थेत भारतीय लोकनृत्याचे शिक्षण.
  • भारत व बाहेर आत्तापर्यंत ५०० च्या वर नृत्याचे कार्यक्रम.
  • काला घोडा, संस्कृती आर्ट फेस्टिवल, साउथ इंडियन फेस्टिवल मध्ये कार्यक्रम सादर केले आहेत.
  • गीत रामायण, संत चैतन्य महाराज या नृत्य नाट्यामध्ये काम केले आहे.

परिचय – संगीता दळवी

  • गुरु जतींदर बन्सल पाल व गुरु राजी नारायण यांचेकडे भरतनाट्यमचे शिक्षण.
  • हिंदुस्थानी संगीताचे शिक्षण वडील श्री. सावंत गुरुजी यांचेकडे.
  • भारतीय लोकनृत्याचे शिक्षण श्री. तुषार गुहा यांचेकडे.
  • भारत व बाहेर आत्तापर्यंत ५०० च्या वर नृत्याचे कार्यक्रम.
  • काला घोडा, संस्कृती आर्ट फेस्टिवल, साउथ इंडियन फेस्टिवल मध्ये कार्यक्रम सादर केले आहेत.
  • गीत रामायण, संत चैतन्य महाराज या नृत्य नाट्यामध्ये काम केले आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here