आज १५ ऑगस्ट २०१८. भारतीय स्वातंत्र्य दिवस. गतकाळाच्या दिडशे वर्षांच्या प्रदीर्घ गुलामी नंतर भारताने स्वातंत्र्याचा सुवर्ण दिवस पाहिला. जगाच्या पाठीवर कदाचित अन्य कोणताचं असा देश नसेल, ज्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शंभराहून अधिक वर्षांची लढाई लढावी लागली. या लढाईत अनेकांनी आपल्या घरा-दारावर, सुख-ऐश्वर्यावर, स्वत:च्या देहावर तुळशीपत्रे ठेवली आणि देशासाठी बलिदान केले. आपल्या दापोलीतील टिळक, आंबेडकर, साने गुरुजी या महापुरुषांचा तर स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. दापोलीने त्यांच्या रूपाने आणि महर्षी कर्वे, रँग्लर परांजपे, पा.वा.काणे यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. कारण लढ्याचा उद्देश केवळ स्वातंत्र्यप्राप्ती एवढा नव्हता, तर सुराज्यप्राप्ती हा होता. आणि हा उद्देश सफल करण्यासाठी त्यावेळच्या लोकांनी प्राण पणाला लावून प्रयत्न केले आणि सर्वतोपरी त्याग केला. त्या त्यागाची, हाल-अपेष्टांची किंमत आज वर्तमान पिढीला आणि भविष्य पिढीला कळणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच दृष्टीकोनातून आम्ही दापोलीच्या इतिहासात झाकायला सुरुवात केली. तर आम्हाला दापोलीतील ३६ क्रांतिकारकांची नावे नोंद असलेली एक यादी आढळली. त्यातील पाच स्वा.सैनिकांची ( ज्यांची नावे दापोली नगरपंचायतच्या क्रांतीस्तंभावर आहेत; त्यांची.) आम्हाला शक्य झाली तेवढी माहिती आम्ही प्राप्त केली व आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने तिचं माहिती तुमच्यासमोर आणित आहोत.
ह्या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा, शौर्याचा इतिहास पाहिला तर त्यावेळचा अन्याय सहन न करणारा, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक मूल्ये जपणारा एक संवेदनशील; पण सशक्त समाज आपल्याला दिसून येतो. त्या समाजाचा अभ्यास किंवा अनुकरण आजच्या कठीण परिस्थितीकरता अत्यावश्यक आहे.
दापोलीतील क्रांतिकारकांची नावे-
कै. भार्गव महादेव फाटक
मु.पो.ता. दापोली
श्री. पुरुषोत्तम गणेश मराठे
मु.पो.ता. दापोली
श्री. केशव धोंडू शेडगे
मु.पो. हातीप.ता. दापोली
श्री. सी.एच. गायकवाड
मुलुंड, मुंबई
श्री. मानाजी धोंडू जाधव
मु.पो. वाकवली. ता. दापोली
कै. चंद्रकांत खेमजी मेहता
मु.पो. हातीप.ता. दापोली (केळसकर नका)
श्री. शिवराम गणेश गोंधळेकर
मु.पो. आसोंड.ता. दापोली
श्री. भगतसिंह भार्गव फाटक
मु.पो.ता. दापोली (गोवा स्वा. सै)
श्री. रावजी शंकर केळकर
मु.पो.पालगड.ता. दापोली
श्री. रत्नलाल पानाचंद भांडारी
मु.पो. दाभोळ.ता. दापोली (गोवा स्वा. सै)
श्री. श्रीपत नारायण तांबे
मु.पो.भाटघर.ता. दापोली
कै. शिवराम भिकू मुरकर
कै. सुडकोजी बाबुराव खेडेकर
कै. गंगाधर मोरेश्वर अधिकारी (हर्णे)
कै. श्रीधर व्यंकटेश केळकर (दाभोळ)
शंकर धाकू खडपुरे (किरांबा)
वसंत अनंत खानोलकर
शंकर मोरेश्वर खांबोटे (कोळथरे)
कै. नरहरी गोविंद गणफुले (केळशी)
गोविंद रामचंद्र गायकवाड (टांगर)
कै. वसंत गणपत गुहागरकर (जालगाव)
कै. गोपाळ रावजी गोगटे (जालगाव)
कै. भिकाजी बाळकृष्ण गोडबोले (पालगड)
कै. लक्ष्मण भिकाजी गोडबोले (पालगड)
यशवंत बाळाराम जाधव (आंजर्ले)
गजानन विश्वनाथ जोशी (पालगड)
विनायक महादेव जोशी (आडे)
कै. रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे (मुर्डी)
अच्युत रामचंद्र बेहेरे (आडे)
कै. नरसी भिकू मेहता (दापोली)
कै. शंकर कृष्णा राणे (बुरोंडी)
कै. रामचंद्र कृष्णाजी रुमडे
कै. विलास श्रीकृष्ण वैद्य (उसगांव)
मधुसुदन रघुनाथ वैशंपायन (पंचनदी)
गोविंद कानू शिगवण (बुरोंडी)
कै. पांडुरंग सदाशिव साने गुरुजी (पालगड)
“दापोली” ह्या विषयावर तेथील शिवकालीन, ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय, शिक्षणक्षेत्र, कृषी, पर्यटन, तेथील उद्योग व्यवसाय याची इत्थंभुत माहिती पुस्तकी स्वरूपात हवी आहे.
उपलब्ध असल्यास; प्रकाशकाचे नाव सुचवल्यास; शतशः आभारी.
आमच्या वेबसाईट वर आपल्याला आवश्यक असलेली माहिती बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तरी आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून हवी असेल तर
परिचित अपरिचित दापोली – लेखक विजय तोरो
हे पुस्तक उलब्ध आहे.