प्रोजेक्टबद्दल :
मुरुड, दापोली जिल्ह्यातील इतर गावांप्रमाणे एक सुंदर छोटेसे गाव. महर्षी कर्वेंच्या महान आणि गाजलेल्या जीवनपटातील सुरवातीची काही पाने ह्या दापोलीच्या मुरुडमध्येच उलटली. त्यांच्या अगदी बालपणापासून ते बालविधवेशी गाजलेल्या दुसऱ्या लग्नापर्यंत त्यांच्या दापोलीच्या जीवनपटाविषयी माहिती गोळा करून डिजिटल माध्यम्यात उपलब्ध करून देणे ह्या प्रोजेक्टचे संक्षिप्त स्वरूप आहे. अजून पर्यंत मिळालेल्या माहितीवरून तरी ह्या प्रयात्नांना एका सतत चालू असणाऱ्या संशोधनाचे वा माहितीपटाचे स्वरूप येऊ शकेल असे आम्हाला वाटते.
संशोधनाचे विषय :
महर्षी कर्वे
मुरुड, दापोली
दुर्गा देवी मंदिर, मुरुड
प्रोजेक्टमध्ये सापडलेले संशोधनाचे नवीन विषय :
१. उत्तरेतून आलेले कनोजा ब्राह्मणांनी, गंगाधर भटांना, पद्माकर भट व त्यांचे शिष्य वैशंपायन यांना सोबत घेऊन एकूण ५ गावांची रचना करून ती बसविली. ह्यात मुरुड व गुहाघर ह्या गावांचा उल्लेख सापडतो, त्यांच्या नकाशात देखील बरेचसे साम्य आहे. ह्या पाचही गावांची माहिती मिळवून त्यांच्या गावांच्या रचना व नियोजनाचा अभ्यास गाव आणि शहरांच्या आधुनिक नियोजनासाठी महत्वाचा ठरेल.
२. मुरुड मधील दुर्गा मंदिराचे कोरीव काम हि कलाकृती दापोली किंवा कोकणातील नसून तिच्यावर दक्षिणेकडच्या मंदिरांचा प्रभाव आहे. मुरुडमधल्या ५ कुटुंबांनी पेशवाईत, देशी विदेशी मिळवलेला पैसा आणि ज्ञान अशा कुशल कामगार वर्गावर खर्चून मंदिराची उभारणी केली. ह्या कामगार वर्गाबद्दल अजून माहिती करता येईल.
३. मुरुडची प्राथमिक मराठी शाळा हि अत्यंत जुनी आहे, शाळेत १८५४ पासूनचे सर्व रेकॉर्ड उपलब्ध आहेत. महर्षी कर्व्यांचे हि सीखां ह्याच शाळेत झाले. ह्या रेकॉर्ड्समध्ये कर्वेंच्या शालेय जीवनाबद्दल अजून माहिती मिळू शकेल.
४. मुरुडच्या मंदिरात टांगलेली पुर्तुगीज बनावटीच्या घंटेबाबत कुठलीही ठोस माहिती नाही केवळ दोन आख्यायिका आहेत
श्रेय :
अण्णासाहेब कर्वे समिती
SNDT वूमेन्स युनिव्हर्सिटी
मुरुड प्राथमिक शाळा, मुरुड
दुर्गा देवी मंदिर, मुरुड
महर्षीं कर्वे वाचनालय, मुरुड
वझे संग्रहालय, मुरुड
श्रीमती जानकी उदय बेलोसे (अध्यक्ष – महर्षीं कर्वे वाचनालय, मुरुड)
श्री यशवंत शंकर घाग (कार्यवाहक – महर्षीं कर्वे वाचनालय, मुरुड)
श्री अरविंद यशवंत घाग (लिपिक – महर्षीं कर्वे वाचनालय, मुरुड)
अमिता वझे व निलेश वझे (वझे संग्रहालाय, मुरुड)
संदर्भ :
मुरुड ऐतिहासिक आणि साहित्यिक – वामन रामचंद्र गानू
महर्षी कर्वे आत्मवृत्त – महर्षी धोंडो केशव कर्वे
सहभाग घेण्यासाठी
तुम्ही संशोधनातल्या कुठल्या विषयावर सहभाग घेऊ इच्छिता ते खालील पत्यावर कळवा.
ई-मेल : [email protected]
व्हाट्सअँप ग्रुप : 7045350707