महर्षी कर्वे स्मृतिस्थळ – मुरुड

0
431

Karve Smritisthal

 

कोणत्याही द्रष्ट्या किंवा युगपुरुषाचे, विचार व कार्य पुढे सरकण्यासाठी आवश्यक असतात, त्या प्रेरणादायी विचारांतगर्त कृतज्ञतेने काम करणारे कार्यवाहक.

महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य आणि विचार त्यांच्या मूळ गावी पुढे नेण्याचा वसा उचलला आहे वझे कुटुंबीयांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड हे अण्णांचं मूळगाव. तेथील वझे कुटुंबीयांनी आपल्या राहत्या घरी अण्णांचं स्मृती स्थळ उभारलं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला अमिता ताई वझे अण्णांची व त्यांच्या समवेत निष्ठेने कार्य करणाऱ्या लोकांची तपशीलवार माहिती देतात.

अमिता ताई आपलं हे कार्य अगदी आत्मतल्लीन होऊन करतात. यामागची खरी प्रेरणा स्वतः अण्णाचं आहेत, अशा त्या सांगतात. अण्णांचं कार्य हे स्त्रीभाग्य बदलवणारं असल्यामुळे भारतातील प्रत्येक स्त्रीने त्यांचे ऋण मानलेचं पाहिजेत, असं त्यांना वाटतं. या स्मृतिस्थळाला आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. मुरुडमध्ये येणारे बरेचसे पर्यटक देखील आवर्जून या स्मृतिस्थळाला भेट देतात..

अमिता ताई तशा एक सर्वसामान्य गृहिणी असल्या तरी या स्मृती स्थळामार्फत त्या दोन पिढींमधल्या दुवा बनल्या आहेत. आजच्या पिढीला मागच्या पिढ्यांनी केलेली कष्टतपस्या उमजणं आणि जुना ज्ञानवारसा पुढे नेण्यासाठी सज्ज करणं ही काळाची अत्यंत मौल्यवान गरज आहे अस त्यांना वाटतं. अमिता ताईचं कार्य आज इवलंसं वाटत असलं तरी ते भविष्यात मोठा परिणाम साधणारं आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्यास तालुका दापोलीमार्फत मनपूर्वक शुभेच्छा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here