Our lady of sorrow church

0
1685

दापोली तालुक्यात ख्रिस्ती  धर्मीयांची एकूण तीन प्रार्थनास्थळे आहेत. त्यापैकी एक पोर्तुगिजांनी बांधलेले तर दोन ब्रिटिश काळातील. ब्रिटिश कालीन  चर्चपैकी एक चर्च सध्या संपूर्णता भग्नावस्थेत  असून  दुसरे चर्च मात्र अजून जसेच्या तसे उत्तमरित्या राखण्यात आलेले आहे. हे चर्च दापोली शहराच्या मध्यवर्ती स्थित असलेल्या पंचमुखी मारुती मंदिराच्या मागच्या बाजूस आहे. हे चर्च ख्रिश्चनांचे असले तरी  सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी खुले आहे. चर्चमध्ये माता मेरीचा सुंदर पुतळा आहे. 1822 साली गोव्याच्या ग्रॅब्रियल बाप्टिस्ट  नामक इसमाने गोव्याच्या लॉरेन्स पिंटो या व्यक्तीच्या मदतीने हा पुतळा दापोलीत आणला व सदर  जागी ख्रिश्चनांसाठीसाठी प्रार्थना स्थळ निर्माण केले. या  प्रार्थनास्थळाचे पूर्वीचे नाव होते our lady of plety चर्च. 1868  मध्ये बॉम्बेचे न्यायाधीश  आणि एक आर्मी कॅप्टन यांनी पुढाकार घेऊन चर्च नव्याने बांधले व चर्चेआधी चे नाव बदलून our lady of sorrow असे ठेवण्यात आले. सध्या फादर बेनिटो फर्नांडीस हर्णेच्या व या चर्चचे धार्मिक कार्य पाहतात. दापोलीत येणाऱ्या पर्यटकांनी या चर्चेला जरूर भेट दिली पाहिजे. कारण ही एक जुनी वास्तू आहे आणि या प्रार्थनास्थळी एक अलौकिक  मनशांती लाभते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here