फलोत्पादन पिकांवरील कीड आणि रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप)

0
2018

योजनेचा उद्देश :
आंबा, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू या पिकांवरील कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्याबाबत उपाययोजनेसाठी सल्ला देणे.

समाविष्ट जिल्हे :
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा (23 जिल्हे)

लाभार्थी निवडीचे निकष :
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांमार्फत आंबा, डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी व चिक्कू उत्पादक शेतकऱ्यांची निवड केली जाते.

योजनेचे स्वरुप :
महाराष्ट्र राज्यामध्ये अंाबा, डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी व चिकू ही मुख्य फळपिके लागवडीखाली आहेत. त्यानुसार आंबा फळपिकाखाली पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद या जिल्ह्यात 86,276 हेक्टर क्षेत्र; डाळींब पिकाखाली नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद व धुळे या जिल्ह्यात 87,981 हेक्टर क्षेत्र; केळी पिकाखाली जळगाव, अकोला, सोलापूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात 27,460 हेक्टर क्षेत्र; संत्रा पिकाखाली अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर जिल्ह्यात 79,348 हेक्टर क्षेत्र; मोसंबी पिकाखाली औरंगाबाद व जालना जिल्ह्यात 31,823 हेक्टर क्षेत्र आणि चिकू फळपिकाखाली पालघर या जिल्ह्यात 2,216 हेक्टर क्षेत्र असे एकूण 23 जिल्ह्यातील एकूण 3,15,104 हेक्टर क्षेत्रावर हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत कीड सर्वेक्षकांमार्फत प्रत्यक्ष बागांना भेट देऊन कीड व रोगांसंबधात निरीक्षणे घेण्यात येतात. त्यानंतर राष्ट्रीय संशोधन केंद्र, कृषि विद्यापीठे यांच्या मदतीने सल्ले तयार करण्यात येत असून माहिती तंत्रज्ञानाद्वारे सदरची माहिती एस.एम.एस. द्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते.

योजनेची अंमलबजावणी : महाराष्ट्र राज्यात सन 2011-12 पासून आंबा, डाळींब व केळी या फळपिकांवरील कीड व रोगंाच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कीड आणि रोग सर्वे क्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

घटकनिहाय आर्थिक मापदंड :
या योजनेंतर्गत
(अ) कीड आणि रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन पद्धती,

(ब) कीड आणि रोग सर्वेक्षण व शेतकरी जागृती कार्यक्रम,

(क) आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधांचा पुरवठा,

(ड) आय टी सुविधा इ. घटकांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here