निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या व दापोली कोकण कृषि विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या मुर्डी गावात डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१/१२/२०२० रोजी अळंबी संवर्धन प्रशिक्षण पार पडले.
श्री देव विमलेश्वराच्या मंदीरात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामगीतेचे स्तवन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ.संतोष वरवडेकर–नोडेल ऑफिसर उन्नत भारत अभियान यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ.मकरंद जोशी–प्रमुख वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.प्रमोद बोरकर, सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग, यांनी अळंबी संवर्धन व स्वयंरोजगार याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉ. संजय भावे –संचालक विस्तार शिक्षण; डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ यांनी अध्यक्षीय भाषणात शेती व शेती पूरक व्यवसाय याबद्दल आपले विचार मांडले. उर्वरीत सत्रात डॉ. श्रीकांत रीटे –कनिष्ठ संशोधन सहाय्यक वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी अळंबी संवर्धनाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थींना दाखवले.
सदर कार्यक्रमात श्री. किरण सांबरे – सरपंच मुर्डी. तालुका www.talukadapoli.com चे प्रमुख श्री.किरण बेलोसे, मुर्डी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री . शशी पेंडसे; ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.