कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील?

0
5751

कोकणात अपारंपरिक पिके कशी घेता येतील? यासंबंधी ‘उन्नत भारत अभियान, दापोली’ आयोजित शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना झालेले मार्गदर्शन.

गाजर

प्रस्तावना

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही.

गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलवा , जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात.

हवामान जमीन

गाजर हे थंड हवामानात वाढणारे पिक आहे. गाजराला आकर्षक रंग येण्‍यासाठी तापमान 15-20 अंश से. असावे लागते. 10 ते 15 अंश से.  तापमानाला तसेच 20 ते 25 अंश से.तापमानाला गाजराचा रंग फिक्‍कट असतो. ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या शेवटी व नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात गाजराची लागवड केल्‍यास जास्‍त उत्‍पादन मिळून गाजराचा आकार आणि रंग चांगला राहतो. परंतु गाजराची लागवड सप्‍टेबर ते डिसेंबर महिन्‍यापर्यंत करता येते. उत्‍तम वाढीसाठी 18 ते 24 अंश से. तापमान अतिशय पोषक आहे.

गाजर हे जमिनीत वाढणारे मूळ आहे. म्‍हण्‍ूान गाजराची वाढ व्‍यवस्थित होण्‍यासाठी लागवडीसाठी निवडलेली जमिन मऊ भुसभुशीत असावी भारी जमिनीची मशागत व्‍यवस्थित करुन जमिन भुसभुशीत करावी. गाजराच्‍या लागवडीसाठी खोल भुसभुशीत गाळाची आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी, सामु 6 ते 7 असणारी जमिन निवडावी.

सुधारीत जाती

पुसा केसर, नानटीस, पुसा मेधाली या गाजराच्‍या सुधारित जाती आहेत.

हंगाम

महाराष्‍ट्रात गाजराची लागवड खरीप आणि रब्‍बी हंगामात केली जाते. रब्‍बी हंगामातील गाजरे जास्‍त गोड आणि उत्‍तम दर्जाची असतात. रब्‍बी हंगामातील लागवड ऑगस्‍ट ते डिसेबर तर खरीप हंगामातील लागवड जून ते जूलै महिन्‍यात करतात.

लागवड पध्दती

गाजराच्‍या लागवडीसाठी जमिन खोल उभी – आडवी नांगरुन घ्‍यावी. जमिन सपाट करुन घ्‍यावी. बी सरीवरंब्‍यावर पेरावी. दोन वरंब्‍यातील अंतर 45 सेमी ठेवावी बियाची टोकून पेरणी करतांना 30 ते 45 सेमी अंतरावर सरी ओढून दोन्‍ही बाजूंनी 15 सेमी अंतरावर टोकन पध्‍दतीने लागवड करावी. पाभरीने बी पेरतांना दोन ओळीत 30 ते 45 सेमी अंतर ठैवावी आणि नंतर विरळणी करुन दोन रोपातील अंतर 8 सेमी ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी गाजराचे सुमारे 4 ते 6 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाणे उगवून येण्‍यास पेरणीनंतर 12 ते 15 दिवस लागतात. पेरणीपूर्वी बियाणे 24 तास पाण्‍यात भिजत ठेवल्‍यास हा काळ कमी करता येतो.

खते आणि पाणी व्यवस्थापन

गाजराच्‍या पिकाला दर हेक्‍टरी 80 किलो नत्र 60 किलो स्‍फूरद आणि 60 किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्‍फूरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा लोगवडीनंतर 20 दिवसांनी द्यावी. जमिनीच्‍या मगदुरानुसार 20 ते 30 गाडया शेणखत जमिनीच्‍या पूर्वमशागतीच्‍या वेळी मिसळून द्यावे.

बियांची उगवण चांगली होण्‍यासाठी जमिन तयार झाल्‍यावर वाफे आधी ओलावून घ्‍यावेत आणि वाफसा आल्‍यावर बी पेरावे. पेरणी केल्‍यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उगवण झाल्‍यावर नियमित पाणी देऊन पिकाच्‍या 50 दिवसाच्‍या कालावधीत जमिनीत चांगला आंलावा टिकून राहील याची काळजी घ्‍यावी. हिवाळयात 7 ते 8 दिवसांच्‍या अंतराने पाणी द्यावे. गाजर काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी देणे बंद करावे म्‍हणजे गाजरात गोडी निर्माण होते. पाण्‍याचे प्रमाण जास्‍त झााले तर गाजरात तंतुमय मुळांची वाढ जास्‍त होते.

कीड रोग आणि त्यांचे नियंत्रण

गाजराच्‍या पिकावर साडया भुंगा (कॅरट विव्हिल) सहा ठिपके असलेले तुडतुडे आणि रूटफलाय या किडीचा उपद्रव होतो. सोंडया भुंगा आणि तुडतुडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 10 मिली मेलॅथिऑन मिसळून फवारावे. गाजरावर रूटफलाय या किडीची प्रौढ माशी गर्द हिरव्‍या ते काळसर रंगाची असते. या किडिच्‍या अळया पिवळसर पांढ-या रंगाच्‍या असून त्‍या गाजराची मुळे पोखरुन आत शिरतात आणि आतील भाग खात त्‍यामुळे गाजराची मुळे वेडीवाकडी होतात आणि कुजतात. गाजराची पाने सुकतात. या किडीच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 3 मिली डायमेथॉएट मिसळून फवारावे. गाजराच्‍या पिकावर करपा, भुरी, मर पानांवरील ठिपके इत्‍यादी रोंगाची लागण होते.

काढणी उत्पादन आणि विक्री

गाजराची काढणी बियाणाच्‍या पेरणीनंतर 70 ते 90 दिवसात करतात.  गाजरे चांगली तयार व्‍हावीत म्‍हणून काढणीपूर्वी पिकाला 15 ते 20 दिवस पाणी देण्‍याचे बंद करावे. कुदळीने खोदून हाताने उपटून किंवा नागराच्‍या ससाहारूयाने गाजराची काढणी करावी. गाजरावरील पाने कापून गाजरे पाण्‍याने स्‍वच्‍छ धुवून घ्‍यावीत. लहान मोठी गाजरे आकारानुसार वेगळी करावीत. गाजराचे उत्‍पादन हेक्‍टरी 8 ते 10 टन इतके मिळते.

बीट लागवड

जमीन आणि हवामान –
बीट हे थंड हवामानातील पिक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही. तापमान १० अंश सेल्सीअसपेक्षा कमा झाल्यास बीटच्या खाण्यायोग्य मुळाची पुर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते.
बीटची लागवड निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतू बीट हे जमिनीत वाढणारे कंदमुळ असल्याने बीटच्या लागवडीसाठी भुसभुशीत आणी पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. अतीभारी जमिनीत बीटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो. बीटच्या लागवडीसाठी जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. जमिनीचा सामू ९ ते १० पर्यत असणा-या खारवट क्षारयुक्त जमिनीतही बीटचे पिक उत्तम येते. महाराष्ट्रातील हवामानात रब्बी खरीप हंगामातही बीटची लागवड केली जाते.

लागवडीचा हंगाम –
बीट हे थंड हवामानात वाढणारे पिक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. बीटच्या रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करावी. महाराष्ट्रातील हवामानात बीटचे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. त्यासाठी बियांची पेरणी जून-जुलै महीन्यात केली जाते.

वाण –
बीटच्या आकारमानाप्रमाणे त्याचे चपटे, गोल, लंबगोल आणि लांब असे प्रकार पडतात. डेट्राईट डार्क रेड आणि क्रिमसन ग्लोब या दोन गोल आकाराच्या जाती भारतात चांगल्या वाढतात.
१) डेट्राईट डार्क रेड- या जातीची मुळे एकसारखी गोल आकाराची, मुलायम असतात. मुळांचा रंग गर्द लाल असतो. मुळातील गराचा रंग रक्तासारखा गर्द लाल असतो. या जातीमध्ये कंदाचा वरील पानांचा भाग कमी असतो. पाने गर्द हिरव्या रंगाची व मरून रंगमिश्रीत असतात. या जातीचे पिक लागवडीनंतर ८०-१०० दिवसांत तयार होते. हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे.
२) क्रीमसन ग्लोब- या जातीची मुळे गोल चपट्या आकाराची असतात. मुळांचा रंग मध्यम लाल असतो. मुळातील गराचा रंग फीकट लाल असतो. कापल्यानंतर यामध्ये रंगाच्या स्तरांची रचना दिसून येत नाही. पाने मोठी गर्द हिरवी आणि मरून रंगमिश्रीत असतात. कंदाचा वरील भाग मध्यम ते उंच असतो.
३) याशिवाय बीटचे क्रॉसब्रॉय इजिप्शीयन आणि अर्ली वन्डर हे उन्नत वाण आहेत.

बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणि लागवड पध्दती –
एक हेक्टर लागवडीसाठी बीटरूटचे ७ ते १० किलो बियाणे लागते. बीटचे एक बी म्हणजे दोन किंवा जास्त बियांचा समूह असतो. बीटची लागवड पाभरीने पेरून किंवा बी टोकून करतात. बीटची लागवड करण्यासाठी ४५ सेंटीमिटर अंतरावर स-या कराव्यात आणि वरंब्यावर १५ – २० सेंटीमीटर अंतरावर बिया टोकून लागवड करावी. काही वेळा ३० सेंटीमीटर अंतरावर पाभरीने पेरणी करतात. नंतर विरळणी करून एका ठीकाणी एकच रोप ठेवावे. बीटचे बी पेरण्यापुर्वी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास बियांची उगवण चांगली होते. बियाणे पेरताना जमिनीत ओलावा असावा. बीटची लागवड ३०-४५ बाय १५-२० सेंटीमीटर अंतरावर करावी.

खते आणि पाणी व्यवस्थापन –
जमिनीच्या मशागतीची वेळी १५- २० गाड्या शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. बीटच्या पिकाला ६०-७० किलो नत्र, १०० ते १२० किलो स्फुरद आणि ६०-७० किलो पलाश दर हेक्टरी द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद आणि पलाशची पुर्ण मात्रा बियांची पेरणी करताना द्यावी. नत्राची उरलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी द्यावी. हलक्या जमिनीत लागवड केल्यास नत्राची मात्रा वाढवावी.
कंदाच्या चांगल्या वाढीसाठी पिकाला पाण्याचा भरपूर पुरवठा करावा. जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकांची वाढ चांगली होते. पिकवाढीच्या काळात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात पिकाला ८-१० दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे.

आंतरमशागत आणि आंतरपिके –
बीटच्या बियाण्याची पेरणी केल्यानंतर विरळणी करणे आवश्यक आहे. बिटच्या एका बीजामध्ये २ ते ६ बिया असतात आणि त्यातील प्रत्येक बी उगवू शकते. म्हणून बीटमध्ये विरळणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
विरळणी करतांना एका ठीकाणी फक्त एकच रोप ठेवावे. आणि बाकीची रोपे हातांनी काढून टाकावीत. पिकातील तण खुरप्याने काढून निंदणी करावी आणि शेत तणरहीत ठेवावे. पीक ४५ दिवसाचे झाल्यावर खोदणी करून मुळाला भर द्यावी. बीट हे क्षारांना दाद देणारे पिक असल्याने बीट ३-५ पानांवर असताना १० लिटरला २ किलो मिठाचे द्रावण फवारल्याने तणांचा नाश होतो. पण याच्याऐवजी इतर तणनाशकांचा वापर करणे आंतरपिक म्हणून फळबागांमध्ये घेता येते. मिरचीसारख्या अधिक कालावधीच्या पिकामध्ये वाफ्यांच्या स-यांवर बीटची लागवड आंतरपिक म्हणून करता येते.

काढणी आणि उत्पादन –
बीटच्या कंदाची वाढ ३ ते ५ सेंमी झाल्यावर काढणी करावी. बीटरूटची काढणी हातांनी उपटून करावी. काढणी करताना मुळांवा इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. बीटची काढणी बियांच्या लावणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी करावी. बीटची मुळे आतून स्पंजासारखी होण्यापुर्वी त्यांची काढणी करावी. काढणीनंतर कंदाची प्रतवारी करावी. कंद विक्रीला पाठविण्यापुर्वी त्यांची पाने काढून टाकावीत आणि कंद पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. कंद पॉलिथीनच्या पिशव्यांत भरून पाठविल्यास जास्त काळ चांगले राहतात. काही वेळा ४-६ बीट जुड्यांमध्ये एकत्र बांधून विक्रीस पाठवतात. बीटचे उत्पादन हेक्टरी २५ टन इतके मिळते.

बटाटा

प्रस्‍तावना

बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो.

हवामान

बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.

जमीन

मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.

पूर्वमशागत

जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.

लागवडीचा हंगाम

बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात.

वाण

कुफरी लवकर  ही ६५ ते ८० दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक वव मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल असते.

कुफरी चंद्रमुखी  ही जात ९० ते १०० दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन २५० क्विंटल पर्यंत मिळते.

कुफरी सिंदुरी  ही जात १२० ते १३५ दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ३०० क्विंटल पर्यंत मिळते.

या शिवाय कुफरी बादशाहकुफरी कुबेरकुफरी ज्योतीअलंकारकुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत

बियाणाचे प्रमाण

बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन ३० ग्रॅम आणि बविस्टोन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात ५ मिनिटे बुडवून व नंतर लागवडीसाठी वापरावी.

लागवड

सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त २५ ते ३० ग्रॅम असावे. बेण्याचा आकार म्ध्याम असून बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन बियांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. ट्रँक्टरच्या सह्हायाने सरी वरंबापद्धतीने लागवड करावी

खते व पाणी व्यवस्थापन

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर  व बटाटा पोसण्याच्यावेळेस ६ ते ८ दिवसांच्याअंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्यापाळ्या कमी कराव्यात

आंतरमशागत

बटाट्यच्या आंतरमाशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे हे महत्वाचे काम आहे. तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुशभूशित  ठेवावी. खताचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीचा भर द्यावी.

रोग व कीड

रोग

करपा  पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.

उपाय

डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मर  मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते.

उपाय

पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.

चारकोल राँट किंवा खोक्या रोग  या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात.

उपाय

जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.

कीड

देठ कुडतरणारी अळी  राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात.

उपाय

या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी

मावा व तुडतुडे  या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.

उपाय

लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि १० लिटर पाण्यात फावरावे.

बटाट्यावरील पंतग  हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातूनहोते. परंतुनुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात.

उपाय

या किडीच्या बंदोब्स्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.

काढणी व उत्पादन

सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पिक घेतल्यास लवकर तयार होणार्या जातीचे उत्पादन हेक्टरी २०० क्विंटल व उशिरा तयार होणा-या जातीचे उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल पर्यंत होऊ शकते.

कांदा

प्रस्‍तावना

कांदा हे व्‍यापारिदृष्‍टया सर्वात महत्‍वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1.00 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर सातारा हेक्‍टरी जिल्‍ हेक्‍टरी कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते.

हवामान

कांदा हेक्‍टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्‍त असते.

जमीन

पाण्‍याचा उत्‍महिन्‍यातम निचरा असणारी भुसभूशीत जमिन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते.

पुर्वमशागत

जमीनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाचे पाळया देऊन ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमिनीत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे.

लागवड हंगाम

महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात.

वाण

बसवंत ७८० : खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्‍यमहिन्‍यात ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

एन ५३ : ही जात खरीप हंगामासाठी योग्‍य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्‍टरी उत्‍पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.

एन– 2-4-: ही जात रब्‍बी हंगामासाठी योग्‍य असून रंग भगवा व विटकरी आहे. कांदा आकाराने मध्‍यम गोल असून साठवणूकींत हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल मिळते.

पुसा रेड : कांदे मध्‍यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्‍यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

बियाण्‍याचे प्रमाण

हेक्‍टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.

लागवड

कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत.

झारीने पाणी घालावे. बी उगवल्‍यानंतर गरजेप्रमाणे पाटाने पाणी द्यावे. फुलकिडे व करपा यांच्‍या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्‍यात 15 मिली मोनोक्रोटोफॉस व 25 ग्रॅम डायथेनएम 45 तसेच 50 ग्रॅम युरीया व 10 मिली सॅडोवीट यासारखी चिकट द्रव्‍ये मिसळून दर 10 दिवसांच्‍या अंतराने 4 ते 5 फवारण्‍या कराव्‍यात. रोपांना हरब-यासाठी गाठ तयार झाली की रोप लागवडीस योग्‍य समजावे. खरीप कांदयाची रोपे 6 ते 7 आठवडयांनी व रब्‍बीची 8 ते 9 आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी 24 तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते. सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी. रोपांची लागवड 12.5 बाय 7.5 सेमी अंतरावर करावी.

खते व पाणी व्‍यवस्‍थापन

कांदा पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद व 50 किलो पालाश लागवडीच्‍या वेळी घ्‍यावे. त्‍यानंतर 1 महिन्‍याने 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी दयावे. कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात 6 ते 8 दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.

आंतरमशागत

रोपांच्‍या लागवडीनंतर शेतात तण दिसल्‍यास हलकी खुरपणी करावी. काढणीपूर्वी 3 आठवडयांअगोदर पाणी बंद करावे म्‍हणजे पानातील रस कांद्यामध्‍ये लवकर उतरतो आण माना पडून कांदा काढणीस तयार होतो.

रोग व कीड

कांदयावर प्रमुख रोग म्‍हणजे करपा हा रोग बुरशीपासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चटटे पडतात. शेंडयापासून पाने जळाल्‍ यासारखी दिसतात. खरीप कांदयावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूलकिडे किंवा अळया हेक्‍टरी अगदी लहान आकाराचे किटक पातीवरील तेलकट पृष्‍टभागात खरडतात. व त्‍यात स्‍त्रवणारा रस शोषतात. त्‍यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

उपाय

फुलकिडे व करपा रोगाच्‍या नियंत्रणासाठी पुनर्लाण केल्‍यानंतर दोन तीन आठवडयांनी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फॉमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू एस.सी. 550 मिली अधिक डायथेन एम 45, 75 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायथेन झेड – 78, 75 डब्‍ल्‍यू डी पी 1000 ग्रॅम अधक 500 ग्रॅम सॅडोवीट चिकट द्रव्‍य 500 लिटर पाण्‍यात मिसळून पाहिली फवारणी करावी. पहिल्‍या फवारणी नंतर तीन चार आठवडयांनी दुसरी फवारणी करावी. या फवारणीच्‍या वेळी प्रती हेक्‍टरी फॉस्‍फोमिडॉन 85 डब्‍ल्‍यू.एस.सी. 100 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 इसी 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 डब्‍ल्‍यू. एस.सी. 550 मिली अधिक कॉपर ऑक्झिक्‍लोराईड 50 डब्‍ल्‍यू. पी. 1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्‍ल्‍यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्‍यात मिसळून फवारावे.

काढणी व उत्‍पादन

कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्‍यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात. 60 ते 75 टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे. कुदळीच्‍या साहारूयाने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर 4, 5 दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा. नंतर कांदयाची पात व मळे कापावे. पात कापताना 3 ते 4 सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा 4 ते 5 दिवस सावलीत सुकवावा. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

 

कोबी ( Brassica Oleracea) (पत्तागोबी, गड्डाकोबी)
लागवडीचा हंगाम सप्टेंबर –ऑक्टोबर रोप तयार करुन पुर्नलागवड पद्दतीने लागवड केली जाते.
जमिन आणि हवामान पाण्याचा निचरा होणारी जमिन मानवते.
बियाणे आणि लागवडीचे अंतर 240 ते 280 ग्रॅम प्रती एकर
45 X 30 से.मी.
खतांचे प्रमाण 10 ते 12 मे.टन कुजलेले शेणखत प्रती एकर क्षेत्रात लागवडीपुर्वी पसरवुन, गाडुन टाकावे.
50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, व 30 किलो पालाश प्रती एकर
सरासरी उत्पादन 10 ते 12 मे.टन प्रती एकर
पिकाचा कालावधी व वाण 65 ते 80 दिवसांचे पिक
प्राईड ऑफ इंडिया, अर्ली ड्रम हेड, गोल्डन एकर
फ्लावर ( Brassica Oleracea var. botrytis ) (फुलगोबी)
लागवडीचा हंगाम मे- जुन,
जुलै- ऑगस्ट,
सप्टेंबर –ऑक्टोबर
रोप तयार करुन पुर्नलागवड पद्दतीने लागवड केली जाते.
जमिन आणि हवामान पाण्याचा निचरा होणारी जमिन मानवते.
बियाणे आणि लागवडीचे अंतर लवकर तयार होणारे वाण – 200 ते 320 ग्रॅम प्रती एकर
मध्यम ते उशीरा तयार होणारे वाण – 140 ते 160 ग्रॅम प्रती एकर
60 X 30 से.मी. 60 X 45 से.मी.
खतांचे प्रमाण 10 ते 12 मे.टन कुजलेले शेणखत प्रती एकर क्षेत्रात लागवडीपुर्वी पसरवुन, गाडुन टाकावे.
50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, व 30 किलो पालाश प्रती एकर
सरासरी उत्पादन 10 ते 12 मे.टन प्रती एकर
पिकाचा कालावधी व वाण 90 ते 100 दिवसांचे पिक
लवकर तयार होणारे वाण – पुसा क्रांती, पुसा दिपाली, पुसा अर्ली सिंथेटिक, कुवारी, व्हाईट स्नो बॉल, अर्ली मार्केट, अर्ली पटना
मध्यम कालावधीचे वाण – जायंट स्नो बॉल, मेन क्रॉप पटना, पुसा सिंथेटिक
उशीरा तयार होणारे वाण – स्नो बॉल 16, इंप्रुव्हड जॅपनीज, डानिया, हिस्सार -1, सिलेक्शन 7, पुसा शुभ्र, हिमानी, स्वाती, पुसा हिमज्योती.

कोबी, फ्लॉवर लागवड पध्दतीलागवड पध्दती I पिक संरक्षण

खरबूज

खरबूज ही इराण हे मुलस्थान असणारी, नदीकाठावरील वाळूत लागवड केली जाणारी वर्षायू वेल. ही वेल ‘कुकर्बिटेसी’ कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ‘कुकुमिस मेलो’ आहे. खरबूजाला इंग्लिशमध्ये ‘मस्क मेलॉन’ असे म्हणतात. खरबूजाची पाने साधी, हस्ताकृती व पंचकोनी असतात. पानांच्या कडा दंतुर असतात. फुले पिवळी, एकेकटी व लांब केसाळ देठावर येतात. ती फक्त एक दिवसच उमलतात आणि त्यांचे परागण मधमाश्यांद्वारे होते. फळे गोल किंवा लंबगोल व राखाडी असून त्यांवर उभे पट्टे असतात. बिया अनेक व आकाराने चपट्या असतात.

या वनस्पतीची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश,  गुजरात व महाराष्ट्र येथे केली जाते. महारष्ट्रात हे पिके उन्हाळी हंगामात नदीच्यापात्रात घ्यायचे, परंतु आता हे पिक बागायती पिक म्हणून घेतले जाते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्वे काही प्रमाणात असतात. कच्या खरबूजाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. खरबुजाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते.

खरबूज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ९० ते १०० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट असे फळपिक असल्याने सध्या या पिकाच्या लागवडीस खूप वाव आहे.

डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

जमीन :

सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये खरबुजाची लागवड करता येते. चुनखडीयुक्त, खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अति प्रमाणात असणार्‍या कॅल्शियम सल्फेट क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे खरबूज फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. तसेच भारी जमिनीमध्ये वेलींची वाढ जास्त होते, पाण्याचा व जमिनीचा समतोल न साधल्यास फळांना भेगा पडतात. तेव्हा लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम काळ्या ते करड्या रंगाची, ५.५ ते ७.५ सामू असणारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन लागवडीस योग्य आहे. आम्ल धर्मीय जमिनीतही हे पीक तग धरू शकते.

हवामान :

या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. विलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८  अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व  फळधारणेवर  विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलींची वाढ व्यवस्थित होत नाही व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

सुधारित जाती :

जातींची निवड बाजारपेठेच्या मागणीनुसार करावी.

पुसा शरबती : या जातीची फळांचा आकार गोल,किंचित लांबट ,साल खडबडीत जाळीयुक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे ,गर नारंगी रंगाचा व जाड असतो.

अर्का जीत :  ही लावकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल, आकर्षक व पिवळ्या रंगाचे असते.

अर्का राजहंस ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ त्ये १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवनुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.

हरा मधु : ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो,

डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

दुर्गापूर मधु : मध्यम अवधीत तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.

तसेच पुसा मधूरस, पुसा असबाती, अर्का राजहंस, अर्का जेस्ट, पंजाब सुनहरी, पंजाब हायब्रीड, लेनो सफेद, अन्ना मलई,  हरीभरी, इ. विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तर कुंदन, बॉबी, एन.एस.९१०, दीप्ती, सोना, केशर या खाजगी कंपन्यांच्या जातींचाही दर्जा व उत्पादन चांगले असल्याने लागवडीस शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.

नंदुरबार, शहादा भागामध्ये हिरव्या व केशरी रंगाच्या स्थानिक जातींची लागवड करतात. हिरव्या रंगाच्य जातींचा वेगळेपणा म्हणजेयांचा स्वाद अतिशय गोड, पाठ कडक व टिकाऊपणा जास्त असतो. केशरी रंगाचा गर असणार्‍या जाती लवकर मऊ पडतात व स्वाद सपक असतो. या शिवाय लखनऊ सफेदा, खारीधारी, फैजाबादी इत्यादी स्थानिक जातीही लागवडीस योग्य आहेत.

बीज प्रक्रिया :

सुधारित जातीचे एकरी साधारण अर्धा किलो बी पुरेसे होते, तर संकरीत जातीचे बी एकरी १०० ते १५० ग्रॅम लागते. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे. चांगल्या उगवण क्षमतेसाठी बी रात्रभर कोमट पाण्यात भिजवून नंतर सावलीत सुकवून लावल्यास बियांची उगवण २ ते ३ दिवस लवकर, एकसारखी व निरोगी होते. मर होत नाही. बियांची ६ ते ८ दिवसांनी उगवण होते.

डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

लागवड :

खरबूज लागवड बाजारपेठेची मागणी पाहून १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. या पिकाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. एक म्हणजे रोपे तयार करून आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बियांची थेट गादीवाफ्यामध्ये टोकण केली जाते. बी टोकन पद्धतीमध्ये उगवणक्षमता कमी राहाते, त्यामुळे न उगवलेल्या ठिकाणी पुन्हा बी टोकण करावे लागते. यामुळे रोपांची वाढ मागे-पुढे होते, पुढील पीक व्यवस्थापनात त्याचा अडथळा येतो, तसेच मजुरीही वाढते. लागवडीच्या नियोजनानुसार कोकोपीट ट्रेमध्ये खरबूजाची रोपे तयार करावीत. रोपे तयार होण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागतो.

गादीवाफ्याचा आकार दोन फूट रुंद व एक फूट उंच ठेवावा. दोन गादीवाफ्यांमध्ये आठ फूट अंतर ठेवावे. खतमात्रा मिसळल्यानंतर गादीवाफ्याच्या मधोमध ठिबक नळ्या अंथराव्यात. त्यावर शिफारशीत आकाराचा प्लॅस्टिक आच्छादन कागद पसरावा. हा कागद वाऱ्याने उडू नये म्हणून गादीवाफ्याच्या कडेने त्याला मातीची भर द्यावी. गादीवाफा अशा प्रकारे पूर्ण तयार झाल्यावर दोन ओळीमध्ये झिगझॅग पद्धतीने दीड फूट अंतरावर (४० सें.मी.) छिद्रे पाडावीत. त्यानंतर रोपांची लागवड करावी. लागवडीसाठी एकरी सुमारे ३०००रोपे लागतात. लागवडीपूर्वी बेड पूर्ण ओले करावेत. गादीवाफ्यात वाफसा स्थिती आल्यावर रोपांची लागवड सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. लागवडीपूर्वी रोपे कार्बेन्डॅझीमच्या द्रावणामध्ये (१ ग्रॅम कार्बेन्डॅझीम प्रति लिटर पाणी) बुडवून घ्यावेत. गादीवाफ्यावर तयार केलेल्या छिद्रांमध्ये रोपे सरळ उभी राहातील अशा पद्धतीने लागवड करावी. रोपांची लागवड पूर्ण झाल्यावर अर्धा तास ठिबक सिंचन संच चालू ठेवावा.

अन्नद्रव्ये व्यवस्थापन :

लागवडीपूर्वी जमिनीची खोल उभी आडवी नांगरणी करून प्रति एकरी चांगले कुजलेले ७ ते ८ टन शेणखत किंवा कोंबडीखत जमिनीत मिसळून द्यावे. गादीवाफा तयार करत असताना एकरी १० किलो युरिया, १० किलो सुपर फोस्फेट, १० किलो पोटाश तसेच २००किलो निंबोळी पेंड, ४ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅग्नेशिअम सल्फेट, ४ किलो फेरस सल्फेट लागवडीपूर्वी गादीवाफ्यामध्ये मिसळून द्यावीत. लागवडीनंतर १० दिवसांनी एकरी २ किलो प्रत्येकी पीएसबी, अँझोटोबॅक्टर, ट्रायकोडर्मा द्यावे. लागवडीनंतर १ महिन्यांनीएकरी १० किलो याप्रमाणे नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. खते देण्यासाठी बांगडी पद्धतीचा वापर करावा. खतांची मात्रा सुरवातीला कमी असावी. पिकाला फुले लागल्यापासून ते फळे परिपक्व होईपर्यंत विद्राव्य मात्रा वाढवत न्यावी. खते देण्यापूर्वी एक तासभर ठिबक संच चालू ठेवावा. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते द्यावीत. सर्व खते माती परीक्षणानुसार द्यावीत. शिफारशीनुसार खतमात्रा आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्याने फळांच्या उत्पादनात वाढ होते.

पाणी व्यवस्थापन :

हे पिक पाण्याबाबत खूपच संवेदनशील आहेत. सुरवातीच्या काळामध्ये पिकाची पाण्याची गरज कमी असते. पुढे पीक वाढीनुसार पाण्याची गरजही वाढत जाते. फळ लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीत ६५ टक्के ओल कायम राहील अशा पद्धतीने जमिनीच्या मगदुरानुसार व पीकवाढीचे टप्पे लक्षात घेऊन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खताचे नियोजन करावे. पाणी प्रमाणापेक्षा जास्त दिले तर रोग पडण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा पाणी टेक पद्धतीने द्यावे. भिज पाणी पद्धतीमुळे पाणी जादा झाल्यास मुळकुजव्या होण्याची शक्यता असते. प्लॅस्टिक आच्छादनामुळे फळांचा ओल्या जमिनीशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे फळांना इजा होत नाही. फळे एकाच जागी राहिल्यास ज्या बाजूने जमिनीशी संपर्क येतो, तेथे फळांना इजा पोचते. यासाठी फळे मोठी झाल्यानंतर तोडणीआधी किमान एकदा फिरवून घ्यावीत.

डॉ. विनायक शिंदे-पाटील, अहमदनगर

तण नियंत्रण :

वेळोवेळी खुरपणी करून तणांवर नियंत्रण ठेवावे. मल्चिंग केल्याने तण नियंत्रणाबरोबरच मातीचे तापमानही नियंत्रणात राहून त्याचा पिकाच्या वाढीला चांगला उपयोग होईल.

पिक संरक्षण :

कीड:

१) फळमाशी – या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.

२) तांबडे भुंगे  बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.

३) मावा   हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.

तसेच खरबूजावर नाग अळीचा ही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतो.

रोग :

१) भुरी – या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात. थंडी जास्त असल्यास सर्व जातींना भुरी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

२) करपा : वेलवर्गीय पीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये रोगाचे प्रमाण वाढते. पानांवर तपकिरी ठिपके दिसतात. रोग मोठ्या प्रमाणात झाल्यास सर्व पाने गळून पडतात.

३) मर – हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात व कालांतराने मरतात.

विद्यापीठांच्या शिफारशीनुसार फवारण्या घेऊन कीड-रोगांचे वेळोवेळी नियंत्रण करावे.

विशेष काळजी : फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याशी फळांचा संपर्क आल्यास फळे सडतात. ऊन्हापासून संरक्षण करण्यासाठी फळांवर कोरडे गवत ठेवावे.

काढणी व उत्पादन :

साधारणपाने ९० ते १०० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात व २० ते ३० दिवसात काढणी पूर्ण होते. खरबूज तयार झाल्यावर मधुर वास येतो व फळाचा देठ सुकतो. फळाचा रंग बदलू लागल्यानंतर योग्य निरक्षण करून रोज काढणी करावी. खरबुजाचे साधारणत:एकरी १० ते १५ टन उत्पादन मिळते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here