कुडावळे येथे २० ऑगस्ट २०१९ रोजी बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ दापोलीच्या ग्रामीण कृषि कार्यानुभवांतर्गत ‘ बळीराजा ‘ या विद्यार्थी गटातर्फे ‘कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उदघाटन’ करण्यात आले.
सदर माहितीकेंद्रामार्फत लोकांना कोकण कृषि विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या कृषिविषयक योजनांची व नवविकसीत तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. कुडावळे ग्रामपंचायतीमध्ये या माहिती केंद्राचे उदघाटन कुडावळे गावच्या सरपंच ‘श्रीमती सरीता भुवड’ यांच्या हस्ते झाले. यावेळी शास्त्रज्ञ विस्तार शिक्षण विभाग व उन्नत भारतचे नोडल ऑफिसर डॉ. संतोष वरवडेकर, ग्राम समन्वयक व कुडावळे गावचे ग्रामस्थ श्री. विनायक महाजन, श्री.शेखर कदम, ग्रामसेविका सौ. सोनावणे मॅडम, उपसरपंच श्री.विकास भुवड व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.
सदर माहितीकेंद्रात बळीराजा ग्रामीण कृषि कार्यानुभवाचे कृषिदूत किशोर रूपन्नवार, रोहित विशे, दिपक ढोक, कृष्णा गाढवे, शुभम गायकवाड, पराग पाटील, वैभव घाडी, प्रथमेश सुपे, राकेश ठोंबरे, हर्षल गुढे यांच्या मार्फत माहिती दिली जाणार आहे.