कृषि तंत्रज्ञान महोत्सव २०२०

0
1081

डॉ.बा.सा.कोकण कृषिविद्यापीठ दापोली आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण या विषयी कृषि तंत्रज्ञान महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन दि.७/३/२०२० व ८/३/२०२० रोजी करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.सर विश्वेश्वरैया सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमास सन्मानीय आमदार योगेश कदम,सन्मानीय आमदार शेखर निकम,उपविभागीय कृषि अधिकारी श्री दिपक कुठे आणि कुलगुरू श्री संजय सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमात कोकणातील श्री.किरण पाटील (पालघर), श्री.सुशांत नाईक (सिंधुदुर्ग), श्री.संतोष दिवकर (रायगड) व श्री.सुर्यकांत कुंभार (सिंधुदुर्ग) या शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा तसेच  ८/३/२०२० रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शेतकरी सौ. रुपाली मोरे (अलिबाग), सौ.लक्ष्मी गायकवाड (दापोली), सौ. फातिमा मोहिमतुले (दापोली), सौ.कविता चांदोरकर (दापोली), सौ.दीप्ती सावंत (खेड) यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्येक्रमास उपस्थित अन्य शेती तज्ञ व शेतकरी यांच्यात संवाद साधण्यात आला .डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाच्या ‘एग्रोनामी’ विभागामध्ये कृषिविषयक प्रदर्शन या दिवशी शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here