सेवाभावी – ओम शिव भक्त मंडळ

0
1483

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल ) खेडा-पाड्यांतून अनेक गरीब रुग्ण येत असतात. या रुग्णांना व त्यांच्या कुटुंबांना थोडीशी मदत म्हणून इस्पितळातच त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय करण्यात आली आहे. ही सोय केली आहे, दापोलीतील सेवाभावी ‘ओम शिव भक्त मंडळाने’.
ओम शिव भक्त मंडळाची स्थापना दापोलीमध्ये २००६ साली झाली. दापोली बाजारपेठेत व्यापारी म्हणून आलेल्या राजस्थानी बांधवानी कोकणच्या लाल मातीला ऋणी राहण्यासाठी हे मंडळ स्थापन केले. श्री. बाळू बळगट या मंडळाचे अगदी सुरुवातीपासूनचे अध्यक्ष आहेत. मंडळाने कार्याची सुरुवात महाशिवरात्रीस महाभोजन, हनुमान जयंतीस चहा वाटप, राम जयंतीस सरबत वाटप अशा धार्मिक उत्सवांतून केली. पुढे उन्हाळी दिवसांत पाणपोई, अपंगासाठी आरोग्य शिबिरे,  गोशाळेला आर्थिक सहाय्य,असे वेगवेगळे उपक्रम राबवित सामाजिक कार्य चालू आहे. दापोलीत ‘ओम शिव भक्त’ मंडळाप्रमाणे इतरही मंडळे आहेत, जी सामाजिक कार्यसेवा करीत आहेत आणि त्याचा दापोली शहर व तालुक्यातील लोकांना लाभ होत आहे. एक उत्तम समाज (उत्तम दापोली) घडण्याच्या दृष्टीने ही अत्यंत कौतुकाची आणि आनंदाची बाब आहे. ओम शिव भक्त मंडळाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील विडिओ जरूर पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here