सोमवार दि.२३/१२/२०१९ रोजी डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली, उन्नत भारत अभियान आणि दापोली शेतकरी सेवा सहकारी संस्था मर्या. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘राष्ट्रीय किसान दिवस आणि बेगमी महोत्सव’ कार्यक्रम सकाळी १० ते २ या वेळेत सर विश्वैश्वरैया सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘डॉ. बा. सा. को. कृ. विद्यापीठ, दापोली’ चे सन्मानिय कुलगुरू डॉ.संजय सावंत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमातून कुलगुरूंनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर कुलगुरू व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी आणि महिला बचत गटाच्या उत्पादनाच्या प्रदर्शनाचे आणि थेट विक्रीच्या दुकानांचे उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन आणि थेट विक्री २८ डिसेंबरपर्यंत स. १० ते सा. ५ या वेळेत असणार आहे. प्रदर्शन-विक्रीचे ठिकाण कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या मागे, शैक्षणिक संग्रहालय हे आहे.
Recent Articles
कोकणातील आगोट
कोकणातील लोकांना ' आगोट ' हा शब्द तसा नवीन नाही. पूर्वी साधारण मार्चनंतर मे अखेपर्यंत ' आगोट ' ची लगबग कोकणात सर्वत्र...