दापोली येथील कुडावळे येथे शनिवार दि. ५ जानेवारी रोजी उन्नत भारत अभियाना अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सभा झाली. सभेत कृषी शास्त्रज्ञ श्री. डॉ. पी. बी. सानप,कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रांज्ञ व उन्नत भारत चे नोडल ऑफिसर डॉ. श्री संतोष वरवडेकर,ग्रामसमन्वयक श्री.विनायक महाजन, कृषी सहाय्यक श्री. राकेश मर्चंडे,श्री. सचिन पवार,सौ. प्रज्ञा गुडघे यांनी मार्गदर्शन केले यावेळी “आंबा,काजू पिकातील आंतरपिके“ याविषयावर चर्चा झाली. मिश्रकंद लागवडीवर चालना देणे, कंदपिके, भाजीपाला आंतरपिके, भाजीपाला आंतरपिक योग्यता तसेच अननस, वावडिंग, जांभुळ ही पिकं आंबापिक आंतरपिक म्हणून घेता येतील का यावर विचारमंथन झाले. सभेत आंतरपिके कोणती घ्यावी, त्याकरिता जमिनीची निवड, योग्य सुर्यप्रकाश, हवामान, पाणी ,नियोजन, आंतरपिकांचे संवर्धन, बाजारात मिळणारा भाव यावर चर्चा झाली. यावेळी पियुष विसपुते, एकनाथ मोरे , शशिकांत भुवड, दिनेश चव्हाण, अश्विनी वैद्य, शेखर कदम, शांताराम तांबे हे शेतकरी उपस्थित होते .