उन्नत भारत अभियान संपर्क प्रमुख बैठक सोमवारी कुडावळे येथे संपन्न झाली. दापोली यथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियान अंतर्गत कुडावळे येथे संपर्क प्रमुखांची बैठक सोमवार दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी २. ३० वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला उन्नत भारत नोडल ऑफिसर डॉ. संतोष वरवडेकर, ग्रामसमन्वयक श्री. विनायक महाजन, सेंद्रिय शेती अभ्यासक श्री. राजेंद्र भट आणि संपर्क प्रमुख श्री. शेखर कदम, कुडावळे, श्री. शांताराम तांबे, देहेण, श्री. लक्ष्मण राऊत, मुर्डी, श्री. मनोहर जगदाळे, साकुर्डे, श्री. किरण सांबर. मुर्डी हे उपस्थित होते. सभेमध्ये खालील विषयांवर चर्चा झाली-
१) देहेण – धूपबत्ती, अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती प्रशिक्षण
२) कुडावळे – वॉशिंग पावडर निर्मिती प्रशिक्षण
३) कादिवली – दुग्धोत्पादन
४) मुर्डी – कांदळवनातील खेकडा संवर्धन (१७ डिसेंबर नंतर होणार प्रशिक्षणांना सुरुवात)
५) सेंद्रिय शेती प्रशिक्षण
६) जिल्हा नियोजन समिती – प्रकल्प सादर करणार