दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन

    0
    1323

    महाराष्ट्राच्या मातीतला पारंपारिक खेळ मल्लखांब आपल्या तालुक्यातून नष्ट होवू नये आणि दापोलीच्या गावागावातून या खेळाचे खेळाडू तयार व्हावेत, म्हणून २०१३ साली श्री. मंगेश राणे  श्री. विजय भुवड आणि अन्य मल्लखांबप्रेमींनी एकत्र येऊन ‘दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन ’ स्थापन केली.

    या असोसिएशन ला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, मुलांची संख्या वाढती झाली. या वाढत्या संख्येसाठी ‘सरखेल कान्होजी आंग्रे संघ, हर्णे’, ‘सुरुचित्ता मल्लखांब ग्रुप, दापोली’ आणि ‘त्रिवेणी मल्लखांब संघ, आसूद’ येथे स्थापण्यात आला. सरखेल कान्होजी आंग्रे संघ, हर्णे’ येथे ‘श्री.मंगेश राणे व श्री.गौरव राणे’ मुलांना खेळाचे प्रशिक्षण देतात. श्री.मंगेश राणे हे R.D.C.( रत्नागिरी जिल्हा केंद्र ) बँक शाखा हर्णे येथे नोकरीस आहेत. ‘सुरुचित्ता मल्लखांब ग्रुप, दापोली’ याचे प्रशिक्षक ‘श्री. विजय पांडुरंग भुवड’ यांनी देखील ‘श्री. मंगेश राणे’ यांच्याकडूनच प्रशिक्षण घेतले आहे. ‘श्री. विजय भुवड’ हे ‘आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर दापोली’ येथे नोकरीस आहेत. ‘दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन ’ मार्फत  वर्षाला जवळपास दहा ते पंधरा कार्यक्रम होत असतात.(लोकमागणीवरून) गावागावात मल्लखांब सुरु व्हावा, हा या असोसिएशन चा मानस आहे. मागील तीन-चार वर्षात असोसिएशन ने चांगले यश प्राप्त केले आहे. ‘सरखेल कान्होजी आंग्रे संघ’ व ‘सुरुचित्ता मल्लखांब ग्रुप’ यातील गौरव राणे, पंकज भुवड, यश भुवड, पार्थ देवघरकर नामक चार खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत खेळले आहेत. पुण्यात ‘राणी लक्ष्मीबाई’ या शाळेत झालेल्या साहसी खेळ स्पर्धेत सुरुचित्ता ग्रुपमधील विद्यार्थिनी ‘सिद्धी कदम’ हिची उत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली. (या स्पर्धेस १५६ खेळाडू होते.)

    मल्लखांब हा शरीराला बळकटी देणारा आणि मानसिक आरोग्य सुदृढ करणारा खेळ आहे. यामध्ये विविध योगप्रकार आहेत, व्यायाम प्रकार आहेत, पूर्वी शालेय अभ्यासातदेखील या खेळाचा समावेश होता. आजही तो समाविष्ट करता येईल अशी शासनाची तरतूद आहे; परंतु त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मधल्या काळात मल्लखांब हा खेळ नामशेष होण्याइतपत लोकांच्या विस्मरणात गेला होता; परंतु माध्यमांकडून या खेळाचा प्रचार, प्रसार झाला आणि खेळाला नवी संजीवनी मिळाली. ‘दापोली तालुका असोसिएशन ’ सारखी मंडळ पारंपारिक मातीतील खेळ जपत तर आहेत, त्याबरोबर आधुनिकतेशी सांगड घालून या खेळाला पुढे कसं नेता येईल याचीही काळजी घेत आहे. फक्त पालकांनी मनातील भय भीती काढून मुलांना या खेळांकडे पाठवण्याची गरज आहे.

     

    संपर्क:-

    दापोली तालुका असोसिएशन  

    प्रशिक्षक : 

    श्री. मंगेश राणे –  8806133284

    श्री. विजय भुवड – 9270713508 

    • सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ, हर्णे, नाथद्वार नगर
    • सुरुचित्ता मल्लखांब ग्रुप दापोली, मु.गिम्हवणे, सृजन नगर, कोकंबा आळी, भैरीमंदिर रोड, ता.दापोली

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here