शेतकरी म्हंटलं की डोळ्यासमोर आपोआप एक धोतर नेसलेला, शेतात नांगर घेऊन राबणारा माणूस असं चित्र उभं राहतं, कारण लहानपणा पासूनच तशीच चित्र आपण पहिलेली असतात. पण या वेळी मात्र आमची भेट झाली ती एक जुन्या आधुनिक शेतकऱ्याशी! ती ही आपल्या दापोलीत, आपल्या ओळखीच्या केळस्कर नाक्यावर. हा जुना आधुनिक शेतकरी म्हणजे कोकम सोड्याची फॅक्टरी चालवणारे व शेतकऱ्यांबरोबर सतत लहान मोठे उद्योग चालवणारे विनायक महाजन! ज्यांना दापोलीत ‘महाजन काका’ म्हणून ओळखतात. आमची पहिली भेट ही कायम स्वरूपी लक्षात राहण्या सारखी आहे. समोरून एक जुनाट पण मजबुत अशी टाटा सुमो येऊन थांबली. इंजिन बंद करून आतून सत्तरीच्या जवळपास असलेले गृहस्थ उतरतले. अंगावर सदरा, त्याखाली अर्धी चड्डी, लाल मातीने रंगलेले विना चपलेचे. दीपकनी आमची ओळख करून दिली, “हे विनायक महाजन!”
महाजन काका म्हणाले “चला विजय मध्ये चहा घेऊ.” तश्याच उघड्या पायानी ते विजयच्या तुडुंब गर्दीत, घाणीने माखलेल्या लाद्यांवरून वाट काढीत, आम्हाला शेवटच्या टेबलावर घेऊन बसले. त्यांच्या पायाची लाल माती त्या घाणीने माखलेल्या चिकट लाद्यांना अगदी सहज स्टेराइल (निर्जंतुक) करेल असा आत्मविश्वास त्याच्या घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर दिसत होता.
महाजन काकांनी आम्हाला विचारलं: “मग तुम्ही काय करता?” आम्ही त्यांना ‘तालुका दापोली’ बद्दल सांगितलं “आम्ही दापोलीतल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच ठिकाणे, व्यक्ती यांची माहिती डिजिटल स्वरूपात जतन करण्याचं काम करतोय” आणि नंतर महाजन काकांनी जवळजवळ पाऊण तास, कॉलेजात लेक्चर असायचे तसंच नॉन स्टॉप लेक्चर चालवलं पण या लेक्चर दरम्यान काकांची काही वाक्ये आमच्या डोक्यात घर करून गेली.
त्या वाक्यांचं चक्र डोकयात सुरू असतानाच काका म्हणाले “तुम्ही एकदा घरी याना कुडावळ्याला. आमची कोकम सोड्याची फॅक्टरी पाहून जा. “हो. नक्की येऊ” आम्ही म्हणालो आणि त्यानंतर बरेच दिवसांनी एकदा आम्ही सगळे कुडावळ्याला गेलो. तिथे महाजन काकांसोबत संपूर्ण एक दिवस घालवला. आमच्या डोक्यात आमच्या पहिल्या भेटी नंतर बरेच से प्रश्न होते, ते आम्ही त्यांना विचारले आणि ते त्यांना आम्ही अगदी दिलखुलासपणे विचारले आणि त्याची उत्तरं ही त्यांनी तशीच दिली.
“मुंबई सोडून दापोलीला येताना डोक्यात काय विचार होता?” | “ग्रामविकास हा उद्देश होता पण शेती विषयी आस्था होती आणि शेतकऱ्यांमध्येच राहून काहीतरी करायचं होतं.”- महाजन काका | |
“इंडस्ट्रियालायझेशन किंवा ऑटोमेशन बद्दल काय सांगाल?” | “ऑटोमेशन मुळे जितकं production होऊ शकतं तितकंच destruction ही होऊ शकतं”– महाजन काका | |
“शेतीचा विकास या बद्दल तुम्ही काय सांगाल?” | “शेती हा एका साखळीचा भाग आहे आणि विकास हा साखळीतलत्या सगळ्या घटकांचा झाला पाहिजे”– महाजन काका | |
“विकास’ या संकल्पने बद्दल काय सांगाल?” | “विकास हा सर्वांगीण असावा लागतो, एकांगी विकास हा कधी हि होत नाही”– महाजन काका | |
“शेतकऱ्यांच्या विकासा बद्दल काय सांगाल?” | ‘शेतकऱ्याचा विकास हा समाजाच्या विकासासह झाला पाहिजे”– महाजन काका |
|
“शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जेणे करून त्यांना फायदा होईल?” | “शेतकऱ्यांनी भाजी पाल्याचा जोडधंदा केला पाहिजे”– महाजन काका | |
“तुमच्या मते संस्कृती म्हणजे नक्की काय?” | “माझ्या मते वर्षानूवर्षांचा अनुभव म्हणजे संस्कृती”– महाजन काका | |
“तुमच्या शेतकरी उद्योजक संघटनेचा उद्दिष्ट काय आहे?” | “शेती पूरक व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणे”– महाजन काका | |
“तुमच्या अनुभवांपैकी एखादा आठवाणीतील अनुभव सांगाल का?” | “मँगो बेटरमेंट प्रोजेक्टच उदाहरण देतो”– महाजन काका | |
“एकांगी विकासामुळे काय परिणाम होतात असं तुम्हाला वाटतं?” | “समाजात गुन्हेगारी वाढते”- महाजन काका | |
“आपली संस्कृती हि कुठेतरी नष्ट होताना दिसतेय, त्याचं तुच्या दृष्टीने काय कारण असावं?” | “ब्रिटिशांनी पद्धतशीरआपल्या आत्मविश्वासावर आघात केला’ हे कारण आहे आणि भारतीय इंग्रजांना Follow फक्त करतात विचार न करता”- महाजन काका |
|
“Multinational कंपन्याचं मॉडेल भारतात दिसून येतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?” | “ते मॉडेल आल्यामुळेच आज भारतात ट्रेड डेफीसीट आहे” – महाजन काका | |
“दापोलीतील ट्रेड डेफिसिट समजावू शकता का?” | “दर दिवसाला दापोलीतील चिक्कार पैसे बाहेर जातात पण दापोलीत पैसे येत नाहीत, उदाहरण सांगतो”- महाजन काका | |
“तुम्ही कामाच्या व्यापातून ‘समाजसेवे’ कडे कसे वळलात?” | “लहानपणापासूनच आमच्या घरात समाजसेवे व्यतिरिक्त काही न्हवतं, त्यामुळे हे सर्व तिथूनच आलं आहे”- महाजन काका |