को. कृ. वि. दापोली, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प “श्रम विज्ञान व शेतीतील सुरक्षितता” आयोजित कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शन/ प्रात्यक्षिक मेळावा दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ रोजी अभियांत्रिकी कार्यशाळा, नर्सरी रोड, दापोली येथे पार पडला. या मेळाव्याला डॉ. विजय आवारे, प्रमुख अन्वेषक अ.भा.सं.प्र – श्र.शे.सु. दापोली, डॉ.प्रशांत शहारे प्राध्यापक व प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. यशवंत खंडेतोड सहयोगी अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, विनायक महाजन (काका), ग्राम समन्वयक उन्नत भारत व शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्यात हस्तचलित भात वारवणी यंत्र,पदचलित भात मळणी यंत्र, विद्युतचलित भात मळणी यंत्र, हस्तचलित भात लावणी यंत्र, ओले काजू बी सोलनी यंत्र, विद्युतचलित नारळ सोलणी यंत्र, विद्युतचलित सुपारी सोलणी यंत्र, पदचलित सुपारी सोलणी यंत्र, हस्तचलित सुपारी सोलणी यंत्र, हस्तचलित सुपारी फाळसणी यंत्र, पदचलित काजू फोडणी यंत्र, विद्युतचलित नाचणी मळणी यंत्र अशी वेगवेगळी यंत्रे व त्यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
त्र साधने कोकणच्या शेतीला अनुसरून तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होईल. शेतीत अधिक उत्पादन घेता येईल व शेतीतील श्रम काही प्रमाणात कमी होतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात या यंत्रसाधनांचा वापर करावा असे आवाहन मान्यवरांकडून करण्यात आले. यंत्र साधनांचा वापर वाढला तरच ती अधिकाधिक विकसित होतील, ही गोष्ट देखील त्यांनी नमूद केली. उपस्थितांनी स्वहस्ते या यंत्रांची प्रात्याक्षिके करून पाहिली. अधिक माहितीसाठी डॉ. विजय आवारे व डॉ. प्रशांत शहारे यांच्या जवळ शेतकऱ्यांनी संपर्क करावा असे सांगण्यात आले. सदर कार्यक्रम सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत पार पडला. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.
शेतकऱ्यांना सोयीची यंत्रे विकसीत केल्याबद्दल धन्यवाद.
कृपया यंत्रे मिळण्याचा पत्ता कळविणे, तसेच यापुढे अशाच प्रकारचे प्रदर्शन/ मेळावा कुठे होणार असेल तर कळविणे.
धन्यवाद.नक्की कळवू. आम्ही सगळी माहिती आमच्या फेसबुक वर टाकत असतो. आपल्याला ती माहिती तिथून मिळेल- http://www.facebook.com/talukadapoli
नाचणी मलणी यंत्राची किंमत व ठाणे जिल्ह्यात आणण्यासाठीची वहातुक सोय कलवा.