डॉ. कोकण कृषी विद्यापीठ, दापोली. शेतकरी – शास्त्रज्ञ – विस्तार कार्यकर्ते मंच, सभा आठवी. दिनांक १० फेब्रुवारी २०१९, वार – रविवार रोजी वेळवी येथील ग्रामपंचायत सभामंडपात पार पडली. या सभेला डॉ. संतोष वरवडेकर (नोडल ऑफिसर – उन्नत भारत अभियान), डॉ. मंदार खानविलकर, सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या – कोकण कृषी विद्यापीठ, दापोली), विनायक (काका) महाजन, ग्राम समन्वयक उन्नत भारत अभियान, श्री. मधुकर दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष आणि ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.सभेमध्ये तालुक्यातील काजू उत्पादन व उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये,
१) काजू लागवडीत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे शास्त्रज्ञांकडून निरसन करण्यात आले.
२) रासायनिक खत व औषधांशिवाय काजू उत्पादन कसे घेता येईल, याची माहिती देण्यात आली.
३) काजू बियांचा आकार, वजन व गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे सांगण्यात आले.
४) काजू बोंडांचा देखील बियाप्रमाणे व्यावसायिक दृष्ट्या उपयोग कसा होऊ शकतो, यावर अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली.
५) काजूपासून अजून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे तयार करता येतील, यावर विचारविनिमय झाले.
६) काजू उत्पादनाची बाजार मागणी व बाजार भाव या विषयावर सखोल चर्चा झाली.
ही सभा दुपारी 3 ते 5 या वेळेत पार पडली व चहापान होऊन सभेची सांगता झाली. सभेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला.