बाल गणेश मित्र मंडळाची स्थापना सन १९६३ साली झाली. सुरुवातीच्या काळात दिड दिवस या गणपतीची स्थापना केली जात असे.लहान मित्र मंडळींनी मिळून हा सार्वजनिक उत्सव चालू केल्या मुळेच या गणपतीचे नाव बाल गणेश मित्र मंडळ असे ठेवले गेले. श्री. पांडुरंग पाडाळे,श्री.शिंदे आणि श्री.चंद्रकांत परब अशा काही मित्रमंडळींनी या मंडळाची स्थापना केली. विशेष म्हणजे या मंडळाने आजतागायत कोणतीही लोकवर्गणी न जमवता हा उत्सव पार पडला आहे.
स्थापनेच्या काही वर्षानंतर जागेच्या अडचणीमुळे हि गणेशमूर्ती श्री. परब यांच्या घरासमोरील आवारात विराजमान केली जाऊ लागली.स्वतः श्री चंद्रकांत परब मातीची हि मूर्ती बनविण्यास हातभार लावत,कालांतराने या मूर्तीचे स्वरूप बदलून प्ल्यास्टर ऑफ प्यारीस च्या मूर्तीमध्ये झाले.मंडळाने आतापर्यंत रौप्यमोहोत्सवी वर्ष,सुवर्ण महोत्सवी वर्ष दिमाखात साजरे केले.
“एकुलती एक मुलगी” यासारखे कुटुंब नियोजनपर कार्येक्रम राबवून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली.निरनिराळे समाजोपयोगी उपक्रम राबवून अनेक सत्कारमूर्तींचा गौरवही केला.अजूनही श्री.चंद्रकांत परब अध्यक्षपदी आहेत तर श्री. संतोष परब(खजिनदार),श्री.हेमंत घाग,श्री.संजय साबळे,श्री.महेश शिंदे,श्री.गोरे बंधू ,श्री.पुसाळकर बंधू ,श्री.जाधव बंधू व इतर कार्यकर्ते या मंडळाची धुरा व्यवस्थीतपणे सांभाळत आहेत.