गोंधळ

0
3494

  • महाराष्ट्रात अनेक घराण्यांचा कुलाचार म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची अतिप्राचीन परंपरा आहे.
  • गोंधळ हा एक उपासनेचा कुळाचार विधी आहे. म्हणूनच याला विधीनाट्य असेही म्हटले जाते.
  • महाराष्ट्रात ‘माहुरची रेणुका माता व तुळजापूरची भवानी’ ही दोन शक्तिपीठे असल्यामुळे या विधीनाट्याचे ‘रेणुराई व कदमराई’ असे दोन प्रकार पडतात.
  • गोंधळ हा घराच्या अंगणातील मांडवात घालतात. म्हणून त्याला अंगणीय नाट्यप्रकार असेही म्हणतात.
  • गोंधळाच्या पूर्वरंगात गण, गवळण, देवतापूजन व भक्तिसामर्थ्याचे अख्यान सादर केले जाते.
  • उत्तररंगात संवाद, सवालजवाब, नृत्य, गायन या सर्व प्रकारांचा प्रभावीपणे वापर केला जातो.
  • कीर्तन, भराड, तमाशा या सर्व कलाप्रकारांची बीजे या विधीनाट्यात दिसून येतात.
  • गोंधळ हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा लोकनाट्यप्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here