हे दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री.स्वयंभू पंचमुखी मारुती मंदिर. या मारुतीवर समस्त दापोलीकारांची अपार श्रद्धा. येथील हनुमान जयंतीचा सोहळा तर कायम डोळाचित्ते साठून राहील असा असतो. मुख्य बाजारपेठेत स्थित असलेलं हे मंदिर साधं, जुन्या थाटणीचं; पण अतिशय सुंदर आहे. मंदिराला मोठे प्रांगण, रुंद चौकोनी सभामंडप आणि श्रीं च्या मूर्तीचा गाभारा आहे. ही श्रींची मूर्ती कै. अभय पुरी यांना सुमारे १४० वर्षांपूर्वी स्वतःच्या जागेत खोदकाम करताना प्राप्त झाली. त्यांनी स्वतःच्या घराशेजारीच मूर्तीची स्थापना केली. गावातील लोक दर्शनासाठी येत असत. पुढे अनेक लोकांना श्री महिमेचा प्रत्यय आला आणि भाविकांची वाढ झाली. कालंतराने त्या झोपडीचे रुपांतर मंदिरात झाले. १९५२ साली ट्रस्ट स्थापन झाली आणि आता मंदिराचे सर्व कामकाज ट्रस्ट पाहते. सादर मंदिरात मंदिराकडून किर्तनमाला, भजनसप्ताह आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री मारुती मंदिर हे दापोली शहरातील सर्व मंदिरांमध्ये अत्यंत मनाचे मंदिर आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांनी या मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे.
Recent Articles
ब्रिगेडियर निजानंद विष्णू बाळ
दापोली तालुक्यातील लाडघरसारख्या एका दूरस्थ व दुर्गम खेड्यात निजानंद विष्णू बाळ यांचा जन्म १८ डिसेंबर १९१० रोजी झाला. त्या काळात गावात जे...