कु. सतीश शिरीष भोसले.
२०१७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्याची बी.ए.ची पदवी प्राप्त. २०१० पासून ‘प्रेमाचा अर्थ कळू दे’, ‘भटकंती’, ‘मनातला क्रांतिकारी’, ‘सेर सिवराज’, ‘पुडकं’, ‘परमपूज्य बाबसाहेब’ अशा अनेक कवितांचे लेखन. २०१४ मध्ये ‘अबोध’ या लघुपटासाठी पटकथा व संवाद लेखन. २०१४ ते २०१७ ‘एक चुंबनाची गोष्ट’, ‘जीवश्च कंठश्च’, ‘ऑफिसची पहिली पार्टी’, ‘वस्त्रधारण’, ‘मोबाईल’, ‘पेच’, ‘फेसबूक’, ‘सेल्फी’, ‘हर्षा भाभी’, ‘योगायोग’, ‘आमचा कॅप्टन’ या लघुकथांच लेखन. २०१७ पासून ‘मोठ्या जगातल्या छोट्या गोष्टी’ या नावाखाली ब्लॉग लेखन.