तळ्यातला गणपती – मुरुड

0
3856

दापोली हा कोकणातील एक आकर्षक तालुका आहे. येथील निसर्ग हा प्रत्येक गोष्टीने समृद्ध आहे. हया तालुक्याला भव्य अशी लाभलेलि किनारपट्टी महत्वाचा आकर्षण आहे जे पर्यटकांना खुनावत असते. आणि हया किनारपट्टीला लाभलेली छोट छोटी गावे आणि त्याच बरोबर मंदिरे ही देखील महत्वाचा भाग आहेत.

आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत ते म्हणजे दापोली तालुक्यातील मुरुड गावातील तळ्यातला गणपती मंदिर.

मुरुड गावात शिरताच एक आपल्याला एक ग्रामपंचायतिची चौकी लागते तिथे पर्यटकांकडून कर घेतला जातो. पुढे शिरताच एक मार्ग मुरुड गावात आणि दुसरा मार्ग मंदिराच्या दिशेने जातो. डाव्या बाजूला मंदिराचा मार्ग आहे, रस्त्याच्या लगत आपल्याला एक तलाव दिसून येतो . त्या तलावात प्रथम गणपतीची मुर्ती होती पण कालांतराने त्या मूर्तीची झीज झाली. म्हणून ग्रामस्थांनी ती मूर्ती तलावातून बाहेर काढून गणपती मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवलेली आपल्याला दिसते. पण काही भाविकांचा असा समज आहे की गणपती मुर्ती अजुन तलावात आहे. गणपती मंदिराच्या लगत अजुन दोन मंदिरे आपल्याला आढळून येतात. हनुमान आणि महादेश्वराच मंदिर आहे.


महादेश्वर मंदिराची स्थापना श. १८२९ ला झाली. याचा पुरावा म्हणजे मंदिराच्या बाहेरील एका लाकड़ी खांबावर नमूद केले आहे, याची माहिती आम्हाला मंदिराचे पुजारी श्री. प्रशांत वरवडेकर यांनी दिली आहे. हे गणपती मंदिराच्या शेजरिच राहतात. ह्याच वय साधारणता आता ८५च्या वर असावे.  आजही ते ह्या तिन्ही मंदिराची पूजा करतात.


महादेश्वर मंदिरा समोर एक दीपमाळ आहे.  त्रिपुरारी पौर्णिमेला दीपमाळ प्रज्वलन होते आणि येथे उत्सव होतो. तसेच बाजूला नंदी देखील आहे त्याच्या मागे तलाव आहे. महादेश्वराच्या मंदिराच्या बाहेरच सतीचं एक छोटे स्थान देखील आहे.
तसेच हनुमानाचे मंदिर देखील आहे, हे मंदिर देखील पुरातन असल्याचे समजते. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा फारच सुंदर आणि निसर्गाने भरलेला आहे. गणपति मंदिराचा घुमट आपल्याला आकर्षित करतो. तसेच हा रस्ता लाल मातीने मळलेला दिसतो.

मुरुडला प्रत्येक पर्यटकांनी ह्या मंदिराला जरूर भेट द्यावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here