डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१०/०१/२०१९ रोजी कुडावळे येथे कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.सदर प्रशिक्षणासाठी महात्मा गांधी औद्योगिकरण संस्था, वर्धा येथून आलेल्या डॉ.अपराजिता वर्धन, डॉ.आदर्शकुमार अग्निहोत्री, डॉ.जयकिशोर छांगाणी, डॉ. सुधा तिवारी यांनी दंतमंजन, केशतेल, सुगंधी उठणे, कोरफड व गोमुत्रापासून साबण बनविण्याचे प्रात्याक्षिके व त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची लागणारी उपलब्धता याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास नोडल ऑफीसर, उन्नत भारत अभियान – डॉ.संतोष वरवडेकर आणि ग्रामसमन्वयक – श्री. विनायक(काका) महाजन यांची प्रमुख उपस्तिथी लाभली.
सदर प्रशिक्षणास कुडावळे गावचे संपर्क सहयोगी – शेखर कदम, सरपंच-सरिता भुवड, उपसरपंच- विकास भुवड, ग्रामसेवक – श्री.गोलांबडे तसेच ग्रामस्त यांचे विशेष योगदान लाभले.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |