कृषि आणि पूरक उद्योग प्रशिक्षण मुर्डी

1
1446

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२/०१/२०१९ रोजी मुर्डी येथे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबिराला नोडल ऑफीसर, उन्नत भारत अभियान – डॉ.संतोष वरवडेकर, ग्रामसमन्वयक – श्री. विनायक(काका) महाजन आणि डॉ. ए.जी.मोहोड यांची प्रमुख उपस्तिथी होती. डॉ. ए.जी.मोहोड यांनी पॉवर पाँईट प्रेझेंटेशन द्वारे सौर वाळवणी यंत्राची माहिती लोकांना दिली. उघड्यावर पदार्थ (फळे, पालेभाज्या, मासे व अन्य) वाळवल्यामुळे पदार्थाच्या रंग, चव, गुणवत्तेचे कसे नुकसान होते व त्यामुळे पदार्थाच्या किमतीवर केवढा फरक पडतो, हे त्यांनी समजावून सांगितले. मग सौर वाळवणी यंत्राद्वारे हे नुकसान कसे टाळता येईल, या संबंधी मार्गदर्शन केले. हे सौर यंत्र कसे बनवले जाते, ते बनवताना व वापरताना कोणती काळजी घ्यावी याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे सांगितले. कृषी विद्यापीठात सौर वाळवणी यंत्र उपलब्ध आहेत. लोकांनी विद्यापीठात येऊन ते वापरून बघावे, असे त्यांच्या व मान्यवरांच्या द्वारे आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास लोकांची चांगली उपस्थिती होती व लोकांनी सौर वाळवणी यंत्राचा जरूर वापर करून पाहू, असे आश्वासन दिले.

उन्नत भारत अभियान मुर्डी प्रशिक्षणा बद्दलची सविस्तर माहिती – उन्नत भारत अभियान मुर्डी प्रशिक्षण

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here