रविवार दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी डॉ. बा. सा. को. कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू ‘डॉ. संजय सावंत’ यांनी उन्नत भारतचे नोडल ऑफिसर, को.कृषि विद्यापठाचे विस्तार अधिकारी ‘डॉ. संतोष वरवडेकर’ यांच्या समवेत उन्नत भारत अभियनांतर्गत दत्तक गाव कुडावळे येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये उन्नत भारतचे ग्रामसमन्वयक ‘श्री विनय महाजन’ यांचा महाजन बेव्हरेजस हा कारखाना व त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या शीत गुहा यांची पाहणी केली. ‘ श्री. शेखर कदम’ यांच्या शेताजवळील बंधारा व त्यामुळे होणाऱ्या जलसंधारणाची पाहणी करून कुडावळे येथील शेतकरी ‘ श्री. एकनाथ मोरे’ यांच्या शेतीपर्यटन व मत्स्यपालनाच्या दृष्टीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. ‘श्री. सुजन कुलकर्णी’ यांच्याशी वरील विषयावर विस्तृत चर्चा केली. भेटीअंती मोरे यांच्या सदिच्छा भेट वहीत त्यांनी आपला अभिप्राय नोंदवला. त्या अभिप्रायामध्ये त्यांनी एकनाथ मोरे यांच्या प्रयत्नांती आलेल्या यशाचा व विनय महाजन यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून मत्स्यपालना विषयी आणखी माहिती व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
डॉ. बा.सा. को. कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ संजय सावंत यांनी कुडावळे गावाला दिलेली भेट अतिशय स्वागतार्ह आहे. कारण या भेटीमुळे ‘विद्यापीठ आता शेतकऱ्यांच्या दारी’ या संकल्पनेला अधिक चालना मिळेल व विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील संवाद वाढून शेतीत आणि पर्यायी शेतकऱ्यांच्या परिस्थितीत आशादायी सुधारणा घडून येतील.