उन्नत भारत अभियाना अंतर्गत सोमवारी दिनांक २४ डिसेंबर रोजी दापोली तालुक्यातील मुर्डी येथे कांदळवनातील खेकडा संवर्धन प्रशिक्षण झाले. उन्नत भारत नोडल ऑफिसर डॉ. संतोष वरवडेकर, ग्रामसमन्वयक विनायक महाजन, मत्स्य विद्यालय रत्नागिरी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश नाईक, विस्तार शिक्षण उपसंचालक डॉ. केतन चौधरी, मुर्डी ग्रामपंचायत सरपंच, किरण सांबरे, परिक्षेत्र वन अधिकारी वनसंरक्षक सौ. सुरेखा जगदाळे यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिरास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नाईक यांनी ग्रामस्थांना कांदळवनातील व गोड्या पाण्यातील खेकडा संवर्धन प्रशिक्षण दिले. खेकडा संवर्धनासाठी लागवड, खेकडा निवड, यांचे संगोपन, व्यवस्थापन, जागेची निवड, मार्केटिंग या सारख्या विषयांवर मार्गदर्शन दिले. यावेळी ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन केले. शिवाय उन्नत भारत अभियाना विषयी सविस्तर माहिती दिली. ग्रामसमन्वयक विनायक महाजन यांनी धूपबत्ती, अगरबत्ती, मच्छर अगरबत्ती प्रशिक्षण ९ जानेवारी २०१९ रोजी देहेण येथे होणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सांबरे यांनी केले.
Home शेती उन्नत भारत अभियान (दापोली) उन्नत भारत अभियान अंतर्गत मुर्डीत कांदळवनातील खेकडा संवर्धन प्रशिक्षण