गोवा किल्ला, हर्णे

2
5255

दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळ 3 किल्ल्यांचा समूह आहे.  कनकदुर्ग, फत्तेगड व गोवा किल्ला. हे किल्ले  नेमके कोणी बांधले व केव्हा बांधले याची माहिती उपलब्ध नाही; पण हे किल्ले हर्णे समुद्रातील ‘सुवर्णदुर्ग’ किल्ल्याच्या रक्षणार्थ बांधले गेलेले, हे खात्रीशीर रित्या सांगितले जाते. त्यातील गोवा किल्ला हा सुमारे सव्वातीन हेक्टर जागेत पसरलेला आहे. हर्णे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे; परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही. मुख्य प्रवेश द्वार मागल्या बाजूने समुद्राकडे आहे. त्या समुद्राभिमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेली आहेत. महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आणि तटबंदी आहे. या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे.

दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याला  नैसर्गिक  उंचवटा आहे. या उंचवटाच्या भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात. खालच्या भागात मोठा पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे. सध्या किल्ल्याच्या तटबंदीची थोडीशी पडझड झालेली आढळते; परंतु  १८६२ च्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या ६९ तोफा होत्या आणि त्या तोफांची संरक्षणव्यवस्था पाण्यासाठी  19 शिपाई होते, अशी नोंद मिळते. या किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. या किल्ल्यावरून सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हा तर  एक नयनरम्य विलक्षण अनुभव असतो.

सुवर्णदुर्गाची माहिती | कनकदुर्गाची माहितीहर्णे मासळी बाजाराची माहिती

2 COMMENTS

  1. I am staying at Dahisar, Mumbai.
    Harnai Dapoli is my Native place.
    The video helps to re collect old memories. After watching this video my friends are attracted to my village harnai-Anjarle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here