दाभोळचा राजा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना श्री. नरेंद्र जमनादास शहा यांच्या जागेमध्ये सन १९९३ साली,फ्रेंड सर्कल मंडळाचे सदस्य असलेले श्री. भरत पेठकर(ग्रामसेवक)व श्री. प्रकाश मर्दा यांच्या संकल्पनेतून लोकसंघटन व्हावे या मूळ हेतूने झाली.


या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गौरीविसर्जनानंतर अनेक कार्येक्रम राबविले जातात.या कार्येक्रमाअंतर्गत भजन,किर्तन,सुगमसंगीत,ऑर्केस्ट् रा,रेकॉर्डडान्स इ. समावेश असतो. यामध्ये स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्याकरिता जास्त भर दिला जातो . तसेच या मंडळाकडून लोकोपयोगी कार्येक्रमामध्ये रक्तदान शिबीर,धर्माध्यय आयुक्त्त यांनी सुचविल्या प्रमाणे प्रत्येक वर्षी ८५%च्या वरील श्रेणी मिळविणाऱ्या एका विध्यार्थ्याला रोख रुपये ५००० पारितोषिक देण्यात येते.तसेच गावातील गंगासागर तलावाची साफसफाई इ. कामे केली आहेत.