ओम साईराम मित्रमंडळ आयोजित ‘दापोलीचा राजा’ या गणेशोत्सवाची स्थापना २०१२ साली झाली. दापोलीचा राजा स्थानापन्न झाला आणि खऱ्या अथार्ने सार्वजनिक गणेश मंडळामध्ये सामाजिक कार्यांची,स्पर्धांची चुरस वाढली.

या मंडळाने आतापर्यंत स्थानिक कलाकारांना मंडळामध्ये त्यांच्या कलेला संधी मिळवून दिली. दापोलीतील मूर्तिकार श्री.जगदीश किरडवकर यांच्या कुशल कारागिरीतून श्रींची भव्य १० फुटी मूर्ती साकारली जाते. तसेच इतर सजावट करण्यात कोकण कृषी विद्यापीठाचे श्री. हर्डीकर सर,श्री राजू आग्रे,तसेच श्री माणीक दाभोळे यांचे मोलाचे योगदान असते.
मंडळ दरवर्षी बालमित्रांसाठी चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करते. प्रत्त्येक स्पर्धकाला प्रमाणपत्रक देऊन गौरविले जाते. मंडळ दरवर्षी चलचित्र देखावे सादर करते. यामध्ये आतापर्यंत कोकण वाचावा, अवयव दान यांसारखे पारितोषिक विजेते व समाजप्रबोधनपर विषयच निवडले गेले. याही वर्षी राष्ट्रीय एकात्मका या विषयाचा देखावा आहे. या आयोजनामध्ये मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेश चंद्रकांत कळसकर, उपाध्यक्ष श्री. विशाल नलगे, सेक्रेटरी श्री. सुशील (बाळा) पवार,खजिनदार श्री.अभिषेक गवळी, सल्लागार श्री. केदार साठे,श्री बळवंत फाटक यांचा मोठा वाटा असतो. विशेष म्हणजे सर्व सजावट,देखावे हे टाकाऊ वस्तू पासूनच बनविले जातात. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबर हे मंडळ वर्षभरही अनेक उपक्रम राबवते. त्यामध्ये कब्बडी स्पर्धा,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण या उपक्रमांचा समावेश असतो. स्थानिक तळागाळातील छोटे व्यवसायीक,होतकरू कार्यकर्त्यांच्या कामगिरीमुळे मंडळाचे कार्य ऊल्लेखनीयच आहे.


