शाश्वत ग्रामविकास: जाणीव जागृती आणि नियोजन

0
1269

डॉ. बाळासाहेब सावंत कोकणकृषी विद्यापीठ दापोली आणि उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५/०९/२०१८ रोजी शाश्वत ग्रामविकास: जाणीव जागृती आणि नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सर विश्वेश्वरैया सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला प्रमुख पाहुणे डॉ. जयकृष्ण फड (उपजिल्हाधिकारी) हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे डॉ. सतीश नारखडे (शिक्षण संचालक, कोकणकृषी विद्यापीठ) डॉ. जी.बी. देसाई (कृषी संवर्धन व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख, श्री. आरिफ शहा (कृषी अधिकारी जिल्हा परिषद) प्रा. नरेंद्र प्रसादे, डॉ. दिलीप भगत, डॉ. संजय भावे, डॉ. केतन चौधरी (उपसंचालक विस्तार शिक्षण), श्री. प्रशांत परांजपे (निवेदिता प्रतिष्ठान) व डॉ. मंदार खानविलकर(कोकण कृषी विद्यापीठ) यांची ही उपस्थिती होती. सभेचे सूत्र संचालन डॉ. संतोष वरवडेकर (नोडल ऑफिसर, उन्नत भारत अभियान) यांनी केले व सभेची सांगता श्री. विनायक महाजन (महाजन काका, ग्राम समन्वयक उन्नत भारत) यांनी मार्गदर्शन पर भाषणाने केली. दापोलीत हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्राथमिक टप्प्यामध्ये पाच गावांची निवड केली गेली आहे आणि या पाच गावांचे सरपंच तसेच ग्रामस्थांना या सभेला निमंत्रित केले होते. ही पाच गावे म्हणजे खालील प्रमाणे-

या सभेत ‘चला बदलुया’ हा नारा देत प्रत्येक ग्रामपंचायतीस ग्रामगीतेचा संच पारायणासाठी भेट म्हणून देण्यात आला व तो आपापल्या ग्रामपंचायती मध्ये सवाद्य नेण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानांतर्गत १००० दिवसाचे १० टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आले.

या सभेसाठी वरील गावांतील ग्रामस्थ व कोकण कृषी विद्यापीठाचे श्री. मंगेश बेडेकर, श्री. कुलदीप सातपुते, श्री. सचिन गुरव, श्री. सचिन गुरव, श्री. अजित कांबळे, श्री. प्रमोद चिखलीकर व श्री. श्रीकांत रिठे हे उपस्थित होते.

यातील उपक्रम खालील प्रमाणे

 लघु सिंचन, पशु संवर्धन, दळण वळण, लघु व कुटीर उद्योग, कृषि, सामाजिक वनीकरण, महिला-बाल कल्याण, समाज कल्याण, शिक्षण, पिण्याचे पाणी

या प्रत्येक १०० दिवसांच्या उपक्रमांच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे आहेत

या अभियान संबंधी संपर्क प्रमुख-

१) डॉ. संतोष वरवडेकर (नोडल ऑफिसर, उन्नत भारत अभियान)
मोबाईल क्रमांक- ९४०४१६१४३५

२) श्री. विनायक महाजन (ग्राम समन्वयक उन्नत भारत)
मोबाईल क्रमांक-८१४९२८२४०५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here