दापोली व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव

0
2502

व्यापारी मित्र मंडळ सार्वजनिक गणेश मंडळाची सन १९८५ झाली. दापोली बाजारपेठेतील श्री. मुंदडा यांच्या मालकीच्या जागेत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

त्यावेळेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. शांतीलाल शेठ जैन हे होते. व्यापारी मित्र मंडळाची संकल्पना म्हणजे व्यापारी आणि त्यांचे मित्र मंडळ अशी होती. हे मंडळ लोकवर्गणीतून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवतात. यामध्ये भजन, कीर्तन, जाखडीनृत्य अशा लोककलेंचा समावेश असतो. सध्या शिवाजी चौक बाजारपेठेत विराजमान असणारी श्रीमूर्ती काही वर्षे श्री. पांडुरंग घाटे यांच्या व्यापारी दालनामध्ये स्थापन करण्यात येत होती. सध्या श्री. मंदार प्रकाश केळकर हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत व श्री. भवरशेठ जैन गेली अनेक वर्षे खजिनदार आहेत तसेच व्यापाऱ्यां व्यतिरिक्त श्री. गणेश घाडगे, श्री राकेश विचारे, श्री. पप्पू केळस्कर, श्री. सुहास खानविलकर, श्री. प्रसाद कळसकर,दिनेश नायक, उदय टिकारे,राजेंद्र पेटकर इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश असतो.
हा गणपती नवसाला पावतो असा प्रत्यय लोकांना आला असल्या कारणाने याला ‘नवसाचा राजा’ हे नाव पडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here