चैत्र महिन्यात पोर्णिमा किंवा प्रतिपदा या दिवशी जालगावातल्या भैरी देवळात मोठा उत्सव साजरा केला जातो. भैरी देऊळ त्या दिवशी नक्षीदार रांगोळी आणि पताक्यांनी फारचं सुंदर सजवलेले असते. देवांच्या मूर्ती सुंदर वस्त्रहारांनी सजवल्या जातात. मंदिराबाहेर गोडाधोडाची व खेळण्या-भांडयाची दुकाने लागलेली असतात आणि त्यामुळे या उत्सवाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं.
जालगावतून देवाचं निशाण म्हणून भली मोठी कळकाची काठी आणली जाते आणि देवळासमोरच्या जोतावर उभी केली जाते. जालगावातील ही प्रथम काठी आल्यानंतर लोकांची देवळात गर्दी करण्यास सुरवात होते. दुपारनंतर गिम्हवणे व गव्हे गावातील काठ्या देवळात येतात. काठ्यांसोबत आलेल्या लोकांमुळे मंदिर परिसर माणसांनी गजबजून जातो.
उभ्या केलेल्या तिन्ही काठ्यांवर देव मांडले जातात. या देवांची पूजा व देवाबरोबर आलेल्या मानकऱ्यांचे टिळे, मानपान होतात. टिळा मानपान झाल्यानंतर देवाचीआरती व गोंधळ होतो. छान-सुंदर सजवलेली रौद्र पालखी भैरी देवळातून मग रौद्र मंदिराकडे निघते. उत्सवाचा अनुपम्य सोहळा म्हणजे जालगाव, गिम्हवणे आणि गव्हे या तीनही गावांतील भैरीदेवांची झालेली भेट. जालगाव नंतर असाच उत्सव-सोहळा गिम्हवणे व गव्हे या गावी होतो.
.
kibdly send all your post on my whatsapp no. 09221832676.