दापोलीतील कलाकारांनी साकारल्या नयनरम्य रांगोळ्या

0
1471

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त फ्रेंडशिप दापोली हे मंडळ गेली ३१ वर्षे अविरत या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. सुरुवातीच्या काळात श्री विठ्ठल मंदिरात श्री. विजय भांबुरे यांच्या अध्यक्षतेखाली रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाची सुरुवात झाली.त्यावेळेस स्थानिक कलाकार श्री. प्रदिप दवटे,श्री. किशोर वारसे, श्री. राजू आग्रे इ स्थानिक कलाकार सहभागी होऊन इतरांना प्रेरणा देत असत. नंतरच्या काळात श्री. संजय महाकाळ,कै. संदीप सुवरे व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन गेले अनेक वर्षे श्री. नामदेव महाराज मंदिरात भरवले जात आहे. श्री.शकुनदेव महाकाळ, श्री. अमित रेमजे, श्री. प्रवीण वेळणस्कर, श्री. स्वप्नील शिंदे इ. कलाकारांकडून विविधप्रकारच्या समाज प्रबोधनात्मक रांगोळ्या येथे साकारल्या जातात. सर्वांसाठी हे प्रदर्शन सुमारे १५ दिवस खुले असते. सध्याचे मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास रेळेकर,उपाध्यक्ष श्री. प्रमोद पोळेकर, सेक्रेटरी श्री.राजेश जोगळेकर व मंडळाचे सदस्य श्री.संजय महाकाळ, श्री. राजू देवरुखकर,श्री कल्पेश रेळेकर, श्री.अमित मेहता, श्री. पिंपळे इ. हे उपक्रम मंडळाच्या वतीने राबवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here