इतिहास पर्व – अण्णा शिरगावकर

0
2205

कोकणच्या पर्यटनाची भुरळ आज जगाला पडत आहे. कारण इथला निसर्गचं तसा आहे. महाराष्ट्रातल्या इतर प्रदेशांपेक्षा हा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या अधिक समृध्द आहे. पण या प्रदेशाबद्दल जगाला ज्ञात नसलेली गोष्ट म्हणजे या प्रदेशाचा इतिहास. जो इथल्या भूगोला इतकाच समृध्द आहे. आत्ता आत्ता तो कुठे प्रसिद्धी पावत आहे. साठ-सत्तरच्या दशकापर्यंत तर कोकणाला प्राचीन इतिहासच नाही, असा समज होता. हा समज दापोली तालुक्यातल्या दाभोळ गावात राहणाऱ्या, इतिहास विषयाची कोणतीही पदवी नसलेल्या सामान्य माणसाने खोडून काढला. या माणसामुळे दुसरे ते चौदावे शतक इतक्या मोठ्या कालखंडात आकारास आलेली आणि हीनयान, वज्रयान, शैव, नाथ, गाणपत्य पंथाचा इतिहास जपणारी ‘पन्हाळेकाजी लेणी’ जगासमोर आली. जी विसाव्या शतकापर्यंत नदीच्या गाळाखाली पूर्णपणे लुप्त झाली होती.

असं म्हणतात, ‘कोकण निसर्गाचं एक वरदान आहे.’ पण हा माणूस कोकणासाठी वरदान ठरला. निसर्गाच्या ढिगाऱ्याखाली लपून गेलेली लेणी, नाणी, शिल्पे, शिलालेख, ताम्रपट इ. ऐतिहासिक गोष्टी याने बाहेर काढल्या आणि इतिहास अभ्यासकांना कोकणचा नव्याने इतिहास शोधण्यास भाग पाडले. ही थोर व्यक्ती म्हणजे दलितमित्र, समाजसेवक, साहित्यिक आणि इतिहास संशोधक ‘श्री. अनंत धोंडू शिरगावकर’ म्हणजेच अण्णा शिरगावकर. अण्णांनी जसा इतिहासाच्या क्षेत्रात ठसा उमटवला, तसा त्यांनी शिक्षण, साहित्य, राजकारण इ. क्षेत्रांमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे अण्णाचं आयुष्य हे एक इतिहासाचं पर्व आहे. हे पर्व उलगडण्याचा प्रयत्न आम्ही (www.talukadapoli.com ने) या मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे.

इतिहास संशोधन

अण्णांचं इतिहास संशोधनाच संपूर्ण कार्य हे प्रामुख्याने कोकणावरचं आहे. त्याची सुरुवात कशी झाली? आणि त्यापूर्वीची स्थिती काय होती‍‌? ते अण्णा येथे सांगतात.

कोकणचा इतिहास

कोकण ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे. या कथेमागचं तथ्य, सत्यनारायण कथा आणि कोकणचा इतिहास अडचणीत कशामुळे येतो याची कारणं अण्णा येथे स्पष्ट करतात.

पहिला ताम्रपट आणि पन्हाळेकाजी

पन्हालेकाजी लेणीचा शोध आणि पन्हाळेकाजीचे पन्हाळेदुर्ग नामांतरासाठी झालेले प्रयत्न याची सविस्तर माहिती अण्णा येथे सांगतात.

शिक्षण आणि जनसंघाचे काम

अण्णांचं शिक्षण शाळा किंवा कॉलेजच्या आत बसून झालं नाही. ते कुठं झालं? याची उकल आणि जनसंघात राहून केलेलं राजकीय आणि सामजिक काम अण्णा येथे सांगतात.

परदेश दौरा आणि इस्राईलची आवड

अण्णांनी परदेश दौरे केले. त्यात कोठे-कोठे भेटी दिल्या आणि त्यांच्या नजरेत आलेला इस्राईल देश कसा आहे? याची माहिती अण्णा येथे सांगतात.

प्रतिगामी रूढींना आव्हान

रूढी,परंपरा कशा निर्माण होतात? त्यातून अंधश्रद्धा कशाप्रकारे तयार होते? आणि यांना छेद कसा दिला पाहिजे? याची उदाहरणे देत अण्णा त्याचे विश्लेषण करतात.

संग्रहाचे हस्तांतरण

अण्णांनी त्यांचा मौल्यवान वस्तू संग्रह विनामूल्य रत्नागिरी, दापोली, ठाणे येथे दिला. हा संग्रह देण्यामागच्या कथा अण्णा येथे सांगतात.

सारस्वतांशी ऋणानुबंध

साहित्यिक क्षेत्रात अण्णांचे भरपूर मित्र कसे तयार झाले? आणि गो.नी.दांडेकर व मधु मंगेश कर्णिकांबद्दल असलेल्या आठवणी ते येथे दिलखुलासपाने सांगतात.

बाटली संग्रह आणि दाभोळी लारी

ऐतिहासिक वस्तूंबरोबर दारूच्या बाटल्यांचा संग्रह देखील अण्णांनी केला. तो कसा वाढीला आला? आणि दाभोळी लारी त्यांना कशी प्राप्त झाली? यामागची कथा अण्णा येथे स्पष्ट करतात.

दाभोळ माझे घर

मोठा नावलौकिक प्राप्त होऊन सुद्धा दाभोळ न सोडण्यामागचे कारण काय? याचा उलगडा अण्णा येथे करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here