महर्षी कर्वे वाचनालय – मुरुड

1
3226

maharshi karve vachanalay

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा वैचारिक वारसा घेऊन चालणारं ज्ञानाचं एक सदावर्त म्हणजे दापोलीतील मुरुड गावचं महर्षी कर्वे ग्रंथालय.

दुर्गा देवी मंदिर परिसरात मुरुड प्राथमिक शाळेसमोर असलेलं हे ग्रंथालय अत्यंत जुनं आहे. या ग्रंथालयाची वास्तू पाहताच तिने किती दशकं ओलांडली असावीत याचा अंदाज येतो. सन १९७५ पासून श्री यशवंत शंकर घाग (घाग गुरुजी) तिथले कार्यवाहक असले तरी त्यांच्या म्हणण्यानुसार हि वास्तु आजवर टिकली आहे ती केवळ लोकसहभागामुळे आणि मुरुड गावातील उदार देणगीदारांमुळेच.

इथे येणाऱ्या वाचकांची संख्या मोठी आहे. मुरुड सोडून अन्य गावाचेही लोक इथले सभासद आहेत. ग्रंथालयाची जागा छोटी असली तरी यात १५००० ग्रंथ, ९ दैनिके, ९ साप्ताहिके, २ पाक्षिके व १० मासिके सुरु आहेत. शिवाय अडचणीच्या जागेत देखील वाचकांना ग्रंथालयात बसून वाचन करता येईल अशी तरतूद आहे.

लोकांची वाचनगोडी  वाढविण्यासाठी ग्रंथालयाकडून पुस्तक प्रदर्शन, हळदीकुंकू यासारखे उपक्रम राबवले जात असतात. (स्त्री  वर्ग आकषिर्त करण्यासाठी हळदीकुंकू वगैरे) इथल्या मातीतल्या महापुरुषांचा इतिहास सांगणारी दुर्मिळ पुस्तके देखील इथे उपलब्ध आहेत. शिवाय शालेय मुलांना आवश्यक पुस्तक साहित्य बालसाहित्य स्त्री साहित्य व अन्य इत्यादी.

येथे येणारे पर्यटक देखील या ग्रंथालयाला भेट देत असतात. अण्णाच्या नावाने चालणारं मुरुडमधील हे ग्रंथालय म्हणजे दुर्गादेवीच्या सान्निध्यात सरस्वतीचं मंदिर.

1 COMMENT

  1. Maharshi Karve Pustakalaya Murud pahun Khupach alaukik vatale. Yache nirmate sri Nilesh Vaze yanchyashi sampark karayacha asel tar kay marga ahe. Tyana abhipray dyayacha ahe.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here