देवाचा डोंगर

0
2507

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे ‘देवाचा डोंगर’. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर असलेलं हे ठिकाण चार तालुक्यांचं केंद्रस्थान आणि दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारं आहे. डोंगरावरच्या चार वाड्या दापोली, खेड, महाड, मंडणगड या चार तालुक्यांमध्ये विभागलेल्या आहेत. चारही वाड्यांमधून समस्त धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यवर्ती शंकराचं स्वयंभू स्थान आहे, या स्थानामुळेचं डोंगराला ‘देवाचा डोंगर’ असे म्हटलं जातं. शिवमंदिर अगदी साधेसुधं आहे; पण मंदिराच्या परिसरातून चौफेर जे निसर्गाचे अप्रतिम, विहंगम दृश्य दिसतं, ते डोळ्यांना आणि मनाला अतिशय सुखद करणारं असतं. थंडीच्या दिवसात तर हे ठिकाण अनुभवण्याची निश्चितच एक वेगळी मजा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here